पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०

दुसऱ्या पदांतील स्वनांवर काहीएक परिणाम घडत नाही. ह्या कारणाकरितां पदपाठांत मात्र स्वनांचा विचार फक्त एकेक पदापुरताच समजला पाहिजे.
 पुढे दिलेल्या स्वननियमांसंबंधानें एक मुख्य गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे ती अशी की जोपर्यंत संहितापाठाप्रमाणे पदे परस्पराशीं संबद्ध आहेत तोपर्यंत एका पदांतील उदात्तांस किंवा स्वरितांस दुसऱ्या पदांतील अक्षरांच्या पूर्वीच्या स्वनविशेषांत, आपल्या सांनिध्यामुळे फेरबदल करण्याचे सामर्थ्य असते, परंतु, पदपाठाप्रमाणे पदे पृथक् व स्वतंत्र केली असतां दुसऱ्या पदांतील अक्षरांवर त्यांची सत्ता चालेनाशी होते. ह्मणून खाली दिलेले नियम पदपाठांत, फक्त एकेक पदांतील अक्षरांसच लागू पडणारे आहेत. पदाबाहेरील उदात्तादिकांच्या प्रभावामुळे एकाद्या पदांतील अक्षरांच्या स्वनांत जी विक्रिया संहितेंत झालेली असते ती विक्रिया पदें पृथक् झाली असतां नाहीशी होऊन फक्त त्याच पदांतील उदात्तादिकांच्या योगाने होणारे स्वनविकार कायम राहतात.
 उदात्ताच्या पुढचे अक्षर (व वर लिहिल्याप्रमाणे पदाचे शेवटी उदात्त असल्यास पुढील पदाच्या आरंभीचे अक्षर) अनुदात्त असेल- परंतु त्या अनुदात्तानंतर प्रथम येणारे अक्षर पुन्हां उदात्त किंवा स्वरित नसेल -तर त्या अनुदात्ताचे ठिकाणी स्वरिताचा आदेश होतो व ह्मणून त्या अक्षराचे शिरोभागी स्वरिताचें चिन्ह केले पाहिजे. उदा० - कया॑. येथे "क" हा उदात्त असून "या" जो अनुदात्त त्याचे ठिकाणी स्वरिताचा आदेश झाला आहे. तसेच "को द॑दर्श प्रथ॒मं जाय॑मानम्" ह्या वाक्यांत "कः" हें अक्षर उदात्त असून लागलेच पुढील अक्षर "द" अनुदात्त आहे व त्यानंतरचें दुसरे अक्षर "द" हेही उदात्त किंवा स्वरित नाही, ह्मणून पहिल्या "द" तील अनुदात्ताचे ठिकाण स्वरित होऊन त्याचे "द॑" असे रूप