पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनुदात्त ह्या दोन्ही स्वनांचा संयोग दृष्टोत्पत्तीस येतो, व ह्याच कारणाकरितां स्वरिताच्या प्रथमार्धाचा उच्चार उदात्ताचे धर्तीवर व द्वितीयार्थाचा अनुदात्ताचे धर्तीवर करण्याविषयी व्याकरणांत नियम आहे. (पा० सू० पा० १-१-२२)
 स्वनविशेष (accent), निघात, इत्यादिक हे स्वरोच्चाराच्या (vowels) यद्धतीचेच भेद असल्यामुळे ते निवळ व्यंजनावर कधींही येत नाहीत. कारण कीं, व्यंजनांचा स्पष्टोच्चार स्वरांचे साहाय्यावांचून होत नाही. फक्त स्वर (अच्) किंवा स्वरयुक्त ह्म० स्पष्टोच्चारक्षम अशी व्यंजने (syllables) ह्याही अर्थी "अक्षर" ह्या शब्दाचा उपयोग पुढील लेखांत केला आहे.
 जेव्हां अक्षरांचा संधि होत नाहीं तेव्हां त्यांच्या स्वनांचाही संधि होत नाही. परंतु त्या अक्षरांचे स्वन एकाच वर्गातील नसतील तर त्या अक्षरांच्या केवळ परस्परसांनिध्यामुळेही त्यांच्या स्वनांत फेरफार होत असतात. त्यांचें विवेचन प्रथम केले पाहिजे.
 ऋचेस चार चरण असल्यास लौकिक संस्कृताप्रमाणे संधींच्या व स्वनांच्या फेरफारांच्या सोईसाठी दोन चरण एकत्र समजतात, ह्मणजे दोन्ही चरणांचे मिळून संबंध एक पद मानावयाचे असते. संहितापाठांत, ऋचेचे दोन चरण मिळून एक झालेल्या चरणांतील सर्व पदें परस्परांवर अवलंबून असतात. त्यामुळे उदात्त अक्षराचा परिणाम फक्त त्याच्या पदांतच नव्हे तर त्याच्या मागील व पुढील पदांतील अक्षरांवरही घडत असतो. त्यामुळे ते सर्व स्वन एकाच पदांत आहेत असे समजून त्याच्यामध्ये नियमांप्रमाणे पर्याय केले पाहिजेत. तेव्हां अमुक स्वनापूर्वी किंवा नंतर अमुक स्वन आला असें ह्मटल्याने तो पूर्वी किंवा नंतर येणारा स्वनविशेष त्याच पदांत असला पाहिजे असा निर्बंध संहितापाठांत नाहीं. पूर्वी येणारा स्वन मागील पदाचे अंतींचा व नंतर येणारा पुढील पदाचे आरंभींचाही असू शकेल. पदपाठांत मात्र प्रत्येक पद स्वतंत्र समजले जात असल्याने एका पदांतील स्वनाचा