पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुष्कळ वेळां कांहीं स्वनदर्शक चिह्न करीत नाहीत व उदात्त अक्षरास तर त्याच्या वर किंवा खाली कोणतेही स्वनचिह्न कधीही दिलेले नसतें व द्यावयाचें नाहीं. उदात्त अक्षर सर्वदा स्वनचिह्नरहित असते व पुढे दिलेल्या नियमांनीं बाध येत नसल्यास चिह्नरहित अक्षर उदात्त आहे असें तत्क्षणीं ओळखावे. अनुदात्त अक्षरास सामान्यतः कांहीं चिह्न करीत नाहीत, तथापि चिह्नरहित अनुदात्तांचा व उदात्तांचा संशय पडूं नये ह्मणूनही पुष्कळ वेळां अनुदात्तांस स्वनदर्शक चिन्ह करितात; जसें- अ॒वि॒द॒त्. आतां ह्या शब्दांतील सर्व स्वर जरी अनुदात्त आहेत तरी ते उदात्तांपासून निराळे ओळखितां यावे ह्मणून ह्यांतील अक्षरांचे खाली चिह्ने केली आहेत. "य॒ज्ञाय॑ गृण॒ते" यामध्यें "ज्ञा" व "ते" हा अक्षरें उदात्त आहेत, सबब, त्यांचा उच्चार नेहमीच्या सम स्वरापेक्षा उंच स्वरांत करावा. स्वरित अक्षरांचे शिरोभागीं सर्वकाल त्यांचें स्वनचिह्न केलेच पाहिजे. जसे- परि॑यत्ताय; विश्वाः॑; तन॑यम्. ह्यांतील सर्व चिह्नित अक्षरें स्वरित होत. व्र॒तानि ह्यामध्यें "व्र" हे अक्षर अनुदात्ततर आहे, हाणून त्याचा उच्चार जास्त दाबून गंभीर स्वरांत करावा.
 संस्कृतांत मुख्य स्वन ह्मटला ह्मणजे "उदात्त" हाच असून त्याच्या व्यतिरिक्त अक्षरें निघातरहित अथवा अनुदात्त समजली जातात. ह्याप्रमाणे स्वनपद्धतीत मुख्य भेद दोन होतात. उदात्त व अनुदात्त त्यांच्या एकीकरणानें झालेल्या ध्वनीस स्वरित अशी संज्ञा आहे. ज्याप्रमाणे अक्षरांचा सामान्य स्वन जो सम किंवा अनुदात्त, त्यापेक्षां उंच आवाजांत उच्चार केला असतां उदात्त होतो, त्याप्रमाणेच समस्वनापेक्षां ध्वनि गभीर झाला असतां उत्पन्न होणारा जो अनुदात्ततर त्यासही उदात्ताप्रमाणें स्वतंत्र स्वनभेद मानितां येईल. परंतु एकंदर सर्व स्वन एका उदात्तावरच अवलंबून असल्यामुळे उदात्तासच प्राधान्य येतें. स्वरित हा संयुक्त स्वन आहे. त्यांत उदात्त व अनुदात्त ह्या दोन्ही स्वनांचे संमेलन झाले असल्याकारणाने त्याच्या उच्चारांत उदात्त व