पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "अ"कारापुढें "य" किंवा "व" आणि क्वचित् "न" किंवा "ज" हीं अक्षरे असून ती गुरु नसल्यास ह्म० त्यांच्यापुढे जोडाक्षर न आल्यास "अ"चा लोप होतो. जसे- यं संस्तुभो॒ऽवन॑यो न यन्ति॑; देवो॑ऽनयत्सवि॒ता सु॑पा॒णिः.
 "अयः," "अवे," "अव:" "आवो" ह्या अक्षरांत अंत होणाऱ्या पदांपुढें "अ"कार आल्यास आणि "वः" ह्या सर्वनामामागें "आ," "न," "प्र" "चित्रः," "सवितः," "एव," "कः" ह्यांपैकी एकादे पद असून पुढें "अ"कार येईल तर त्या "अ"काराचा लोंप- होतो. उदा०- को वो॑ऽध्व॒रे वरि॑वो धाति देवाः; तत्स॑वि॒ता वो॑ऽमृ॒तत्वमासु॑वत्.
 ह्या वर निर्दिष्ट केलेल्या स्थलांशिवाय "ए" आणि "ओ" ह्यांचेपुढें येणाऱ्या "अ" चा लोप वेदांत कघीही होत नाही. उदा०- उषो॑ अ॒द्येह गो॑मतिः; जैत्रं॒ यं ते अनु॒मदा॑म संग॒मे.
 वैदिक संधींचा दुसरा विशेष असा आहे कीं, लौकिक संस्कृतांत ज्याप्रमाणे "न्" ह्या व्यंजनापूर्वी दीर्घ स्वर असून पुढे कोणताही स्वर आला तरी त्यांचे संधि संपूर्ण "न" इ० होतात, तसे संधि श्रुतीत होत नाहींत. तर "न्" ह्या व्यंजनापूर्वी "आ" हा स्वर असून पुढे कोणताही स्वर आल्यास त्यांचा संधि न होतां "न्" हा अनुनासिक रहातो. तथापि त्या "न्"च्या पूर्वी "आ" व्यतिरिक्त अन्य स्वर असेल तर त्या अनुनासिकापुढे "र" चा आदेश होतो. उदा०- "विश्वा॑ वि॒द्वान् आर्वि॑ज्या धी॒र॒ पु॒ष्य॒सि॒" ह्यांचा संहितापाठ "विश्वा॑ वि॒द्वाँ आर्वि॑ज्या धीर पुष्यसि" असा होतो. तसेंच, मधु॑मान्नो॒ वन॒स्वति॒ मधु॑माँ अस्तु॒ सू॑र्यः, यत्पू॒ष॑णं युवामहे॒ऽभीशूँ॑रिव सार॑थिः; यु॒वं सिंधूँर॒भिश॑स्तेरव॒द्यात्.
 तसेंच "न्" ह्या व्यंजनापुढे "स"कार आल्यास वर्णांचा विसंवाद दूर होण्याकरितां त्या दोहोंच्यामध्यें "त्" ह्या वर्णाचा आदेश होतो. उदा०-