पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कांही अव्ययें वगैरे थोडेसे शब्द शिवायकरून बाकीच्या सर्व शब्दांत निदान एकादा तरी निघात असतोच, ह्मणजे त्यांपैकी एक अक्षर तरी उच्च स्वरांत उच्चारावयाचे असतें अथवा उदात्त असते; अर्थात् भिन्नभिन्न शब्दांत भिन्नभिन्न स्थानची अक्षरें उदात्त असणार. तेव्हां कोणत्या शब्दांतील कोणतें अक्षर उदात्त वगैरे आहे त्यासंबंधी विस्तृत व्यापक परंतु भानगडीचे नियम थोडक्यात सांगणे दुर्घट आहे व तसे करण्याची जरूरही नाही. याकरितां फक्त वर निर्दिष्ट केलेले उद्दिष्ट पदविच्छेद व पदसंयोग हे बरोवर करितां येण्यापुरतें त्यांचे दिग्दर्शन झाले ह्मणजे पुरे आहे.
 ऋचांच्या पदांचा संयोग अथवा संधि करून त्यांचा संहितापाठ करणें हें संहितापाठाची पदविवृति करण्यापेक्षा बरेंच सुलभ आहे. वैदिक संधींचे व स्वरप्रक्रियेचे सर्व नियम माहित असले तरी ऋचांतील बहुतेक शब्दांचें अर्थज्ञान पूर्वी चांगले झाले असले पाहिजे इतकेच नाही, तर एकंदर ऋचेचा सामान्य अर्थही अवगत असला पाहिजे. त्यावांचून संहितेचीं पदें बिनचूक पाडतां येणें फार कठिण आहे. आपणांस ऋचेतील बहुतेक शब्द माहीत आहेत अशी नुसती समजूत असून उपयोगी नाही, कारण त्यापासून पदच्छेद करण्यांत चुका होण्याचा फार संभव असतो. 'स वनान्यृंजते' व त्याप्रमाणेच 'यजामहेसौमनसाय देवान्' ह्यांची पदें अनुक्रमें 'स वनानि ऋंजते' व 'यजामहे सौमनसाय देवान्' अशी असावीत असे सकृद्दर्शनी वाटतें, परंतु वरील पदच्छेद चुकीचा आहे. ह्याचें वास्तविक कारण स्पष्ट आहे की, अमुक अमुक अक्षरांचे पद होत आहे असे पूर्वीपासूनच माहित असले पाहिजे. निरनिराळ्या पदांचें परिज्ञान अभ्यासाने किंवा अन्य स्वतंत्र रीतीने करून घ्यावे लागते. संहितेतील पद ओळखण्यास एकादा ठोकळ नियम नाहीं. 'सुप्तिडंतं पदं' ह्या सूत्रांत विशिष्ट पदें बिनचूक ओळखण्याची खूण सांगितली नसून सर्व पदांस लागू पडणारें सामान्य लक्षण सांगितले आहे. तेव्हां पुष्कळ पदांचें जेव्हा पहिल्याने