पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९६ - मां देवाः पुरुत्रा व्यदधुः = मां देवाः बहुषु देशेषु कुर्वन्ति विश्वरूपेण अवस्थानात्, यद्यत्कुर्वन्ति तत्सर्वं मामेव कुर्वन्ति इत्यर्थः, सर्व विश्व विश्वांतील प्रत्येक वस्तु हा एक माझाच आकार असल्यामुळे — प्रत्येक वस्तु ही माझेच एक विशिष्ट स्वरूप असल्यामुळे - कोणत्याही स्थळीं देव हे कांहीं कां करनात तें मलाच करतात असें ह्मणण्यास कांहीं हरकत नाहीं. त्यांच्या प्रत्येक कृत्यांत मी आहे व त्यांनी निर्माण केलेली प्रत्येक वस्तु मत्स्वरूपच आहे. भूरिस्थात्रां = बहुभावेन प्रपंचात्मना अवतिष्ठमानां, नानाविध जें हैं जग त्या जगद्रूपानें नटणारी. भूरि आवेशयन्ती = भूरिणि बहूनि [भूतजातानि जीवभावेन आत्मानं ] प्रवेशयन्ती, ह्या अनेक [भूतजातांच्या ठायीं जीवभावाने स्वतःचा ] प्रवेश करविणारी. ना मराठी अर्थः- मी [ सर्व जगाची ] स्वामिनी (राष्ट्री ); [ उपासकां- धनाची ( वस्तनां ) प्राप्ति करून देणारी ( संगमनी ); ज्ञेय जें परब्रह्म तें, भी स्वतःच ब्रह्मस्वरूप असल्यामुळे ] जाणणारी, [व] यज्ञ करण्यास योग्य अशा [ देवांमध्यें ] ( यज्ञियानां ) मुख्य अशी ( प्रथमा) आहे. नानाविध जें हें जग त्या जगद्रूपानें नटणारी ( भूरिस्थात्रां ) [आणि] ह्या अनेक [ भूतांच्या ठायीं जीवात्म्याच्या नात्याने स्वतःचा ] प्रवेश करविणारी ( भूरि आवेशयन्तीं ) अशी जी मी त्या मला ( तां मा ) देत्र अनेक स्थळीं करितात ( पुरुत्रा व्यदधुः = बहुषु देशेषु कुर्वन्ति ) ० देव जें जें ह्मणून करितात त्या त्यांच्या प्रत्येक कृत्यांत मी आहे व त्यांनी निर्माण केलेली प्रत्येक वस्तु मत्स्वरूपच आहे. ऋचा ४ वी:- - प्राणिति=श्वासोच्छ्रासादिव्यापारं करोति. अमन्ववः=[ मां ] अमन्यमानाः, अजानन्तः, मद्विषयज्ञातरहिताः इयर्थः.