पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९५ स्वष्टारं विश्वकर्म्याला. उत= अपि च. दधामि धारयामि, देतों. द्रविणं धनं यागफलरूपं. हविष्मते=हविभिर्युक्ताय. सुप्राव्ये शोभनं हविः देवानां प्रापयित्रे, तर्पत्रिये. सुवन्ते= सोमाभिषवं कुर्वते . मराठी अर्थ - पिळून रस काढण्यास योग्य ( आहनसं ) अशी जी सोमवल्ली तिचे अथवा शत्रूंना मारणारा ( आहनसं ) सोम नांवाचा देव त्याचें- भरण ( पोषण ) मी करितें; त्वष्टयाचें व पूषाचें [ आणि ] भगाचें [ ही ] भरण मी करितें. हवींनीं युक्त ( हविष्मते), शोभन हवि देवांना देणारा ( सुप्राव्ये ) [आणि] सोमरस काढणारा जो यजमान त्याला मी [ यागफलरूप ] धन [ द्रविणं ] देतों ( दधामि = धारयामि ). ऋचा ३री:- राष्ट्री - ईश्वरनाम एतत्. सर्वस्य जगतः ईश्वरी. संगमनी=संगमयित्री, [ उपासकानां ] प्रापयित्री, [ उपासकानां धन ] प्राप्त करून देणारी. चिकितुषी= [ यत्साक्षात्कर्तव्यं परं ब्रह्म तत् ] ज्ञातवती, [स्वात्मतया ] साक्षात्कृतवती, [ज्ञेय जें परब्रह्म तें, स्वतः ब्रह्मस्वरूप असल्यामुळे, ] जाणणारी. प्रथमा - मुख्या. यज्ञियानां= यज्ञार्हाणां. व्यदधुः = विदधति, कुर्वन्ति. पुरुत्रा = बहुषु देशेषु.