पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ऋचा १ ली:- १९४ मंडल १० सूक्त १२५. ( पीटर. नं. ३३.) रुद्रेभिः = रुद्रैः एकादशभिः इत्थंभावे तृतीया तदात्मना इत्यर्थः, रुद्रांच्या स्वरूपांत, रुद्ररूपानें, रुद्रात्मक होऊन. होऊन. वसुभिः = अष्टवसूंच्या स्वरूपांत, वसुरूपानें. आदित्य:- द्वादश आदित्यांच्या स्वरूपांत, आदित्यरूपानें, आदित्यात्मक विश्वदेवैः = विश्वदेवांच्या स्वरूपांत . शुकीच्या ह्मणजे शिंपेच्या ठिकाणी रजताचा ह्म० रुपयाचा भास व्हावा त्याप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी ह्म० ब्रह्मस्वरूप जी वाक् तिच्या ठिकाणी जगाचा नुसता भास मत्र होतो. वास्तविक रीतीनें, मायाच जगद्रूपनें नटत असते. तथापि मायेला ब्रह्माचा आधार असल्यामुळे ब्रह्मालाही, ते असंग आहे तरी, जगत्कर्तृत्व आहे अशा कल्पनेनें ब्रह्मरूप होणारी जी वाक् ती, हें सर्व मी उत्पन्न करितें असें ह्मणत आहे. वास्तविक पहातां ती कांहींच करीत नाहीं. मराठी अर्थ - [ एकादश ] रुद्रांच्या स्वरूपांत भी संचार करितें. [ त्याचप्रमाणे, द्वादश ] आदित्यांच्या व विश्वदेवांच्या स्वरूपांत [ही] मी संचार करितें. मित्र आणि वरुण ह्या उभयतांचें मी भरण करितें, इंद्रानीचें [ही] मी भरण करितें [व] उभयतां अश्विनाचें [ ही ] मी भरण करितें. ऋचा २ री:- -- आहनसं=आहन्तव्यं, अभिषोतव्यं यद्वा शत्रूणं आहन्तारं [ दिवि वर्तमानं देवतात्मानं सोमं . ] हें सोमाचें विशेषण आहे. सोम ० सोमवल्ली घ्यावी अथवा सोम नांवाचा देव घ्यावा.