पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९३ (नः) बाधा न करो ( मा हिंसीत् = मा बाधतां ). [ अशा त्या ] दानादिगुण- युक्त (देवाय ) प्रजापतीची ( कस्मै ) आह्मी हवीनें ( हविषा ) परिचर्या करूं ( विधेम ). ऋचा १० वी :- त्वत्त्वत्तः. ह्याचा “ अन्यः " ह्या पदाशीं अन्वय. "तुझ्यावांचून दुसरा”. एतानि - इदानीं वर्तमानानि. विश्वा = विश्वानि, सर्वाणि. जातानि=प्रथमार्वकारभांजि ० उत्पन्न झालेली. ह्यापुढे “ भूतजातानि " अध्याहृत आहे. ता = तानि. न परिबभूव = न परिगृहाति, न व्याप्नोति त्वमेव एतानि परिगृह्य त्र शक्नोषि इति भावः यत्कामाः = यत् फलं कामयमानाः. ते= तुभ्यं, तुला. जुहुम: हवींषि प्रयच्छामः. तत् तत् फलं. पतय: = ईश्वराः, धनी, मालक. रयीणां धनानां. मराठी अर्थ - हे प्रजापते ! तुझ्यावांचून अन्य कोणी [ ही ], ( त्वत् अन्यः ) हीं ( एतानि ) जीं सर्व (विश्वा) उत्पन्न झालेली (जातानि ) [ भूत- जातें आहेत ] त्यांना (ता) व्यापून टाकण्यास समर्थ नाहीं ( न परिबभूव ). क्या [ फलाची ] इच्छा [ मनांत ] धरून ( यत्कामा: ) [ आह्मी ] तुला हवन करीत आहोंत ( जुडुमः ) तें आह्मांला प्राप्त होवो ( तन्नः अस्तु ). [ तुझ्या कृपेनें ] आह्मी धनाचें ( रयीणां ) मालक ( पतयः ) बनूं ( स्याम =भवेम.)