पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९१ २ मराठी अर्थ - अग्न्युपलाक्षित सर्व जग (अग्निं ) उत्पन्न करणाऱ्या 'महान् (बृहती: ) अपांनी ( आपः ह्म० जलानें ) जो (यत्) [ प्रजापतिरूप ] गर्भ धारण करून ( गर्भ दधानाः ) विश्वाला व्यापून टाकिलें (विश्व आयन् ) • त्या [ गर्भभूत प्रजापती ] पासून (ततः) देवादि सर्व प्राण्यांचा ( देवानां देवा- दिनां सर्वेषां प्राणिनां ) एक प्राणवायु (असुः ) उत्पन्न झाला ( समवर्तत ) [ अशा ] दानादिगुणयुक्त इ. इ. ३ मराठी अर्थ - अग्न्युपलक्षित सर्व जग ( अग्निं ) उत्पन्न करणा-या महान् (बृहती: ) ज्या (यत्) अपांनी ( आपः ह्म० जलानें ) [ प्रजापतिरूप ] गर्भ धारण करून ( गर्भं दधानाः ) विश्वाला व्यापून टाकिलें (विश्वं आयन् ), त्या [ अपां ] पासून ( ततः ) देवादि सर्व प्राण्यांच्या ( देवानां=देवादीनां सर्वेषां प्राणिनां ) प्राणभूत असा ( असुः ) जो एक [ प्रजापति ] तो उत्पन्न झाला ( समवर्तत ) [ अशा ] दानादिगुणयुक्त इ. इ. ऋचा ८ वीः- आपः = अपः. व्यत्ययेन प्रथमा, जरी " आपः " ही प्रथमा विभक्ति आहे तरी ती द्वितीयार्थ समजावी. हें " पर्यपश्यत् " ह्या क्रियापदाचें कर्म आहे. महिना - महिम्ना, स्वमाहात्म्येन. छान्दसो मलोपः. पर्यपश्यत् परितो दृष्टवान्. दक्षं प्रपंचात्मना वर्धिष्णुं प्रजापतिं दधानाः = धारयित्री:. हैं अपांचें विशेषण. यज्ञं यज्ञोपलक्षितं विकारजातं. देवेषु अधि-देवेषु मध्ये. देवः=ईश्वरः. एक: = अद्वितीयः. आसीत् भवति.