पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८६ यथा अग्नेः सकाशात् विस्फुलिंगा: जायन्ते तद्वत्. आत्मदाः ह्मणजे आपले जीवा- त्मे आपणांस देणारा, आपले ठायीं जीवात्म्यांस प्रविष्ट करविणारा. =यदा आत्मनां शोधयिता, आत्म्यांची शुद्धि करणारा. बलदाः = बल देणारा अथवा शुद्ध करणारा, बलस्य दाता शोधयिता वा. विश्वे= [ प्राणिनः ]. उपासते=प्रार्थयन्ते, सेवन्ते वा. प्रशिषं प्रकृष्टं शासनं, आज्ञां. अमृतं = (१) अमृतत्वं, मोक्ष. = (२) यद्वा मरणं नास्ति अस्मिन्निति अमृतं सुधा. मृत्युः = प्राणापहारी यमः . मराठी अर्थ - जो जीवात्म्यांना उत्पन्न करणारा अथवा शुद्धि देणारा आहे. (आत्मदाः ) [ व त्याप्रमाणें जो ] बल देणारा अथवा बलशुद्धि करणारा ( बलदाः ) आहे; सर्व [ प्राणिमात्र ] ( विश्वे ) ज्याची आज्ञा [ प्रशिषं] मान्य करितात. ( उपासते ) [ इतकेंच नव्हे तर ] देव [ही] ज्याची आज्ञा मान्य करितात; सुधा अथवा मोक्ष ज्याच्यापाशीं छायेप्रमाणें [ कनिष्ठत्वाच्या नात्याने ] वागतो (यस्य छाया अमृतं ) [व] यमही ज्याच्या छायेप्रमाणे वागतो [ अशा ] दानादिगुणयुक्त प्रजापतीची आपण हवीनें परिचर्या करूं. ऋचा ३ री:- प्राणतः=प्रश्वसतः, श्वासोच्छ्रास करणाऱ्या. निमिषतः=अक्षिपक्ष्मचलनं कुर्वतः महित्वा = महित्वेन, माहात्म्येन. एक इत्-अद्वितीय एव सन्. राजा= ईश्वरः बभूव=भवति.