पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८५ इन्द्र ह्मणाला कीं, ज्या अर्थी 'अहं कः स्याम्' असे आपण बोलतां त्या अर्थी 'कः " हेंच नांव आपणांस असो. ह्यासंबंधानें “कंदर्प " व " उमा" ह्या शब्दांची व्युत्पत्ति पहावी, ह्मणजे अशा रीतीनें व्युत्पत्ति केलेलें प्रकृत स्थळ एवढेच काय - तें नाहीं असें लक्षांत येईल -- "कं दर्पयामीति मदात् जातमात्रो जगाद च । तेन कंदर्पनामानं तं चकार चतुर्मुखः ॥ " " उ मेति मात्रा तपसो निषिद्धा, पश्चा- दुमाख्यां सुमुखी जगाम. " कस्मै देवाय = दानादिगुणयुक्तं प्रजापति. विधेम= परिचरेम. मराठी अर्थ - जगाच्या उत्पत्तीच्या पूर्वी (अग्रे ) हिरण्मय अंडामध्ये गर्भाप्रमाणे असणारा अथवा हिरण्मय अंड ज्याच्या उदरीं गर्भाप्रमाणे आहे असा प्रजापति (हिरण्यगर्भः) [ परमात्म्यापासून उत्पन्न झाला (समवर्तत = समजाय- त ). उत्पन्न झाल्याबरोबर ( जातः ) तो सर्व विश्वाचा ( भूतस्त्र) एकछत्री ( एक: ) स्वामी ( पतिः ) झाला ( आसीत् ). तिसऱ्या चरणाचे दोन अर्थ होतात- १ मराठी अर्थ - पृथिवी ह्म० विस्तीर्ण अशा लोकाचें व हिच (उत इमां ) ह्म॰ आपल्या डोळ्यापुढे असणा-या त्या भूमीचें तो धारण करितो ( स दाधार. ) २ मराठी अर्थ --- पृथिवीचें ह्म. अन्तरिक्षाचें, द्युलोकाचें व हिचें ह्म. आपल्या डोळ्यांपुढे असणाऱ्या ह्या भूमीचें तो धारण करितो ( स दाधार . ) चवथ्या चरणाचा मराठी अर्थ -- हवि देऊन ( हविषा ) दानादिगुण- युक्त अशा प्रजापतीची ( देवाय कस्मै देव कं ) आह्मी परिचर्या करूं (विधेम. ) ऋचा २री:- आत्मदा:- आत्मनां दाता. आत्मनो हि सर्वे तस्मात्परमात्मनः उत्पद्यन्ते