पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७९ माणें मी प्यालेले [ सोमरस ] मला फार अगत्यानें प्रवृत्त करितात ( उदयंसत= उद्यच्छन्ते ); कारण मी पुष्कळ इ. इ. ऋचा ३ रीः- मा=मां. पीताः = पीताः सोमाः. उदयंसत=उद्यच्छन्ते, उद्युक्त करितात. आशवः - क्षिप्रगामिनः, गमनेन व्याप्ताः वा. मराठी अर्थ - ज्याप्रमाणे वेगाने चालणारे ( आशवः) अश्व हें रथाला चालवितात त्याप्रमाणें मी प्यालेले [ सोमरस ] ( पीताः ) मला उद्युक्त करि- तात ( उदयंसत ) कारण मी पुष्कळ इ. इ. ऋचा ४ थी:- मा=मां. मतिः = [ स्तोतृभिः क्रियमाणा ] स्तुति:. उपास्थित = संयोजयति. संगतिकरण ह्या अथीं “ उप " हा उपसर्ग लाविला ह्मणजे “स्था " ला आत्मनेपद घालतात. वाथा = शब्दायमाना धेनुः. मराठी अर्थः-- ज्याप्रमाणें हंबरणारी गाय ( वाश्रा ) [ लवकर लवकर ] आपल्या प्रिय वत्साप्रत ( पुत्रं ) जाऊन पोचते त्याप्रमाणें [ स्तोत्यांनी केलेली ] स्तुति (मतिः ) मला [ भक्ताप्रत ] भेटविते ( उपस्थित = संयोजयति ) ह्म० आपल्या स्तोत्याला भेटण्यास मला प्रवृत्त करिते; कारण मी पुष्कळ वेळां इ. इ. ऋचा ५ वी. तष्टा=तक्षा, सुतार. चन्धुरं=सारथिनिवासस्थानं, रथं वा.