पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७७ मराठी अर्थ - [ गायत्री आदिकरून जी ] सात [ वृत्ते आहेत तीं ] त्या [ मानसयज्ञाचे ] परिधि झाले. एकवीस समिधा केल्या होत्या. जो (यत्-य:) [ विराट् पुरुष आहे ] त्या पुरुषाला ( तं पुरुषं ), [ मानस ] यज्ञ करीत असलेल्या ( यज्ञं तन्वानाः ) [ प्रजापतीच्या प्राणरूप] देवांनी, पशु कल्पून 'बांधून टाकिलें ( पशुं अबध्नन् ). ऋचा १६ वी :- करणारे. यज्ञं यथोक्तं यज्ञस्वरूपं प्रजापतिं . अयजन्त = पूजितवन्तः. तानि धर्माणि ते प्रसिद्ध विधि. ते महिमानः = ते तदुपासका : महात्मानः नाकं विरादप्राप्तिरूपं स्वर्ग. सचन्त = समवयन्ति प्राप्नुवन्ति. यत्र = यस्मिन्विराट्प्राप्तिरूपे नाके. पूर्वे = पुरातनाः. साध्याः-विराडुपास्तिसाधकाः, विराट् पुरुषाची उपासना साधणारे म० सन्ति = तिष्ठन्ति. मराठी अर्थ - [ प्रजापतीच्या प्राणरूप ] देवांनी [ आपल्या मानस ] यज्ञाच्या योगानें त्या यज्ञरूप प्रजापतीची ( यज्ञं ) पूजा केली ( अयजन्त ) - [ त्या यज्ञांतील ] ते प्रसिद्ध विधि ( तानि धर्माणि ) [ हेच ] पहिले [विधि] होत. जेथें (यत्र ) विराट् पुरुषाची सेवा करणारे ( साध्याः ) पुरातन ( पूर्वे ) "देव (देवाः) वास करीत आहेत (सन्ति) त्या [विराट्प्राप्तिरूपी ] स्वर्गाला (नार्क) ते [ विराट् पुरुत्राची उपासना करणारे ] महात्मे ( महिमानः ) जाऊन पोहोचतात ( सचन्त = समवयन्ति, प्राप्नुवन्ति )