पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ऋचा १३ वीः- १७६ मराठी अर्थ - चन्द्रमा हा मनापासून उत्पन्न झाला. सूर्य हा चक्षूंपासून उत्पन्न झाला. इन्द्र व अग्नि हे मुखापासून उत्पन्न झाले. प्राणापासून वायु उत्पन्न झाला. ऋचा १४ वी:- तथा लोकान् अकल्पयन् = यथा चन्द्रादीन् प्रजापतेर्मनःप्रभृतिभ्यः अक ल्पयन तथा अन्तरिक्षादीन् लोकान् प्रजापतेनीभ्यादिभ्यः देवाः अकल्पयन् उत्पादितवन्तः. भाषान्तर करितांना चवथा चरण अगोदर घ्यावा. मराठी अर्थ - [ प्रजापतीच्या प्राणरूप देवांनी ज्याप्रमाणे चन्द्रादि- कांना विराट् पुरुषाच्या मन इत्यादि अवयवांपासून निर्माण केलें ] त्याचप्रमाणें ( तथा ) [ त्यांनी ] अंतरिक्षादि लोकांना ( लोकान् ) [ विराट् पुरुषाच्या नाभि इत्यादि अवयवांपासून ] उत्पन्न केलें ( अकल्पयन् ). [ तें कसें त्याचाच विस्तार पहिल्या तीन चरणांत केला आहे. ] नाभीपासून अंतरिक्ष झालें, मस्त- कापासून द्युलोक झाला, पायांपासून भूमि उत्पन्न झाली [ आणि ] श्रवणेन्द्रि- यांपासून दिशा उत्पन्न झाल्या. ऋचा १५ वो:-- सप्त- गायत्र्यादीनि सप्त छन्दांसि. त्रिः सप्त समिधः कृताः - त्या यज्ञाकरितां एकवीस समिधा केल्या होत्या. त्या २१ समिधा पुढील पदार्थाच्या होत्या - १२ महिने; ५ ऋतु; स्वर्ग, मृत्यु व पाताळ असे ३ लोक; असे हे २० पदार्थ झाले, व एकविसावा आदित्य. यत्=यः पुरुषः वैराजः अस्ति [ तं पुरुषं ], जो विराट् पुरुष आहे [ त्या पुरुषाला ]. देवाः प्रजापतिप्राणेन्द्रियरूपाः देवाः.