पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७५ व्यकल्पयन् = कल्पना केली, विविधं कल्पितवन्तः. कौ पादौ उच्येते=कोणत्या वस्तूनां त्याचे पाय ह्मणतात. मराठी अर्थ - जेव्हां (यत्) [ प्रजापतीच्या प्राणरूप देवांनीं ] विराट् पुरुषाला ( पुरुषं ) संकल्पानें निर्माण केलें (व्यदधुः ) तेव्हां किती प्रकारा ( कतिधा ) त्यांनी कल्पना केली ( व्यकल्पन् ) ? कोणती वस्तु त्याचें मुख होतें ? कोणत्या वस्तु त्याचे बाहु होते ? कोणत्या वस्तूंना त्याच्या मांडया ह्मणतात ? [ व ] कोणाला त्याचे पाय ह्मणतात ? प्रश्नोत्तररूपानें सृष्टीच्या उत्पत्तीचें वर्णन करण्यासाठी वरील ऋचेंत प्रश्न विचारले आहेत व आतां ह्यापुढे ह्या प्रश्नांची उत्तरें आहेत. ऋचा १२ वी :-- अस्य मुखं आसीत्=अस्य मुखात् उत्पन्नः इत्यर्थः. राजन्य: क्षत्रियवर्णाचा पुरुष. बाहूकृतः = बाहुत्वेन निष्पादितः, बाहुभ्यां उत्पादितः इत्यर्थः. तत् = तदानीं. यत्=यौ. त्याचा “ ऊरू " ह्या पदाबरोबर अन्वय. मराठी अर्थ - ब्राह्मण हा त्याचें मुख होता. क्षत्रियाला त्याचे बाहू केलें होतें. ज्या मांड्या ( यत् ऊरू = यौ ऊरू ) त्या, त्या वेळीं ( तत् = तदानीं ), वैश्य होता, ह्म० वैश्य त्याचे ऊरू बनला होता [व] पायांपासून शुद्र उत्पन्न झाला. मुखादि अवयवांपासून ब्राह्मणादि वर्गीची उत्पत्ति यजुः संहितेच्या प् कांडांत स्पष्ट रीतीने वर्णन केली आहे. तेव्हां ह्या ऋचांतील प्रश्नोत्तरांचा अर्थ त्या वर्णनाशी जुळेल अशाच रीतीनें लावणें हें योग्य आहे.