पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७४ व आहे देवता ज्यांची ( वायव्यान् ) असे जे सर्व प्रसिद्ध वन्य पशु त्यांना- ( तान् आरण्यान् पशून् ) उत्पन्न केलें ( चक्रे ) व त्याचप्रमाणें ग्राम्य पशूंनाही उत्पन्न केलें. ऋचा ९ वी :-- सामानि = सामवेद. मराठी अर्थ - ज्यामध्ये सर्वात्मक अशा पुरुषाला हवि दिला होता अशा ( सर्वहुतः ) त्या यज्ञापासून ऋग्वेद व सामवेद उत्पन्न झाले. [ गायत्री आदिकरून ] वृत्तें [ ही ] त्यापासून [च] उत्पन्न झाली व यजुर्वेद [ ही ] त्यापासून [ च ] उत्पन्न झाला. ऋचा १० वी :- उभयादतः खाली आणि वरती (ऊर्ध्वभागी आणि अधोभागी ) ज्यांना दांत असतात असे. अजावयः - शेळीबकरी. मराठी अर्थ-त्या [ यज्ञापासून ] अश्व उत्पन्न झाले, आणि [ अश्वां- खेरीज आणखीही ] ज्या [ प्राण्यांना ] खाली जाणि वरती दांत असतात असे [ गर्दभादिक ] जे कोणी [ प्राणी ] आहेत ( ये के च उभयादतः ) तेही उत्पन्न झाले. [ त्याचप्रमाणे ] त्या [ यज्ञापासून ] गाई उत्पन्न झाल्या [ व ] त्या [ यज्ञापासून ] शेळीबकरीही उत्पन्न झाली ( अजावयः ). ऋचा ११ वीः- यत् यदा. - व्यदधुः = संकल्पेन उत्पादितवन्तः. कतिधा=कतिभिः प्रकारैः, किति प्रकारांनी.