पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बर्हिषि = [ मानसे ] यज्ञे. १७३ प्रौक्षन्=त्याचे अंगावर उदक प्रोक्षण केलें. साध्याः = सृष्टिसाधनयोग्याः हें देवांचें विशेषण. ऋषयः = मन्त्रद्रष्टारः. मराठी अर्थः- सर्व विश्वाच्या अगोदर ज्याची उत्पत्ति झाली व जो यज्ञाला साधनीभूत होता अशा त्या पुरुषाला, सृष्टि उत्पन्न करण्याला जे योग्य होते अशा देवांनी (साध्याः देवाः ) व [ त्यांना अनुकूल असे ] जे ऋषि होते त्यांनी त्या [ मानस ] यज्ञामध्यें ( बर्हिषि ) [ पशु कपून] प्रोक्षण केले ( प्रौक्षन् ) [व] त्याच्या योगाने त्यांनी आपला यज्ञ सिद्धीस नेला ( तेन अयजन्त ). ऋचा ८ वी:-- सर्वहुतः=हें यज्ञाचें विशेषण आहे. सर्वहुतः सर्वात्मकः पुरुषः यस्मिन्यज्ञे हयते सोयं सर्वहुत्, तादृशात् [ यज्ञात् ]. संभृतं = संपादितं, उत्पन्न झालें. पृषदाज्यं दधिमिश्रितं आज्यं. ह्या योगानें सर्व भोग्य पदार्थ समजावे. तान् = लोकप्रसिद्धान्. वायव्यान् = वायुदेवताकान, पशुंची देवता वायु आहे असें यजुर्बाह्मणांत सांगितले आहे. आरण्यान् = वन्य [ पशु ]. ग्राम्याः = माणसाळणारी, घरगुती ( domestic ). मराठी अर्थः -- ज्यामध्ये सर्वहुत अशा पुरुषाला हवि दिला होता अशा ( सर्वहुत: ) त्या ( तस्मात् ) यज्ञापासून दहीं व तूप ( पृषदाज्यं = दधि- मिश्रितं आज्यं ) [ व असे सर्व भोग्य पदार्थ ] उत्पन्न झाले. [ त्या यज्ञनें ]