पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७२ . मराठी अर्थ - त्या आदिपुरुषापासून विराट् देह ( विराट् ) उत्पन्न झाला [आणि] त्या विराट् देहामध्यें ( विराजः अधि ) [ त्या विराट् देहाचा अभिमानी ह्म० त्या विराट् देहामध्यें वास करणारा असा ] पुरुष उत्पन्न झाला. अशा रीतीनें आदि पुरुषाने विराट् देहामध्यें जन्म घेतल्यानंतर ( स जातः ) · त्या [विराट् पुरुषानें ] [ त्या विराट् देहा ] व्यतिरिक्त अशी [ देवतिर्यङ- मनुष्यादिकांची ] रूपें घेतली ( अत्यरिच्यत ); ह्म० देवतिर्यङ्मनुष्यादिकांचे जीव उत्पन्न केल्या ] नंतर ( पश्चात् ) भूमि व भूमीनन्तर शरीरें ( पुरः ) त्यानें निर्माण केली. ऋचा ६ वी:- यत्=यदा पुरुषेण हविषा वाव्यस्य अनुत्पन्नत्वेन हविरन्तरासंभवात् पुरुषखरू- पमेव मनसा हविष्ठेन संकल्प्य पुरुषेण पुरुषाख्येन हविषा . इध्मः = इन्धन. मराठी अर्थ - जेव्हां (यत्) पुरुषाला हवि कल्पून ( पुरुषेण हविषा ) देवांनी [मानस ] यज्ञ केला तेव्हां वसंत ऋतु हा त्या यज्ञामध्ये ( अस्य ) आज्य झाला, प्रीष्म ऋतु हा इन्धन झाला व शरत् ऋतु हा हवि झाला. पुरुषाला देवांनीं हवि कल्पिलें असें अगोदर झटलें आहे व त्यापुढें वसन्त हा आज्य झाला व शरत् हा हवि झाला असें पुन्हा सांगितलें आहे. ह्यावरून पुरुषाला देवांनी सामान्यत्वेकरून हवि कल्पिलें व विशिष्ट हवींकरितां बसताची व शरदृतूची त्यांनी योजना केली असें दिसतें. ऋचा ७ वीः- तं यज्ञं यज्ञसाधनभूतं तं पुरुषं पशुत्वभावनया यूपे बद्धं, ज्याला पशु कल्पून यूपाचे ठिकाणी बद्ध करून टाकिलें होतें अशा त्या यज्ञाला साधनीभूत अशा पुरुषाला.