पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७० ऋचा ४ थी :- त्रिपात् पुरुषः = योयं त्रिपात्पुरुषः संसारस्पर्शरहितः ब्रह्मस्वरूपः . ऊर्ध्वः उदैत्=अस्मात् अज्ञानकार्यात् संसारात् बहिर्भूतः अत्यत्रैर्गुण- दोषैरस्पृष्टः उत्कर्षेण स्थितवान् हा पुरुष आपल्या तीन अंशासंबंधानें, ह्या संसारापासून अगदी अलिप्त असा असून संसारापेक्षां वरिष्ठ प्रतीचें जें ब्रह्म- स्वरूप त्यामध्यें राहिला आहे. घेऊन. इह = मायायां, ह्या संसारामध्ये. अभवत्= आगच्छति. पुनः पुनः पुनः, पुन्हां पुन्हां. ततः=मायायां आगत्य अनंतरं, ह्या संसाररूपाने नटल्यानंतर मग. विष्वङ्=देवतिर्यगादिरूपेण विविधः सन् देव मनुष्यपश्वादि विविध रूपें व्यक्रामत्-व्याप्तवान् . साशनानशने - साशनं भोजनादिव्यवहारोपेतं चेतनं प्राणिजातं लक्ष्यते, अनशनं तद्रहितं अचेतनं गिरिनद्यादिकं . अभि=अभिलक्ष्य. मराठी अर्थः- हा पुरुष आपल्या तीन अंशांनी ( त्रिपात् ) [ ह्या भासमान विश्वापेक्षां ] वरिष्ठ प्रतीचें जें त्रह्मस्वरूप त्यांत ( उर्ध्वः ) राहिलेला आहे (उदैत्=स्थितवान् ]. त्याचा एक अंश ( मात्र ) इह हा० या मायेमध्यें - या संसारामध्यें - पुनः पुनः येतो ( पुनः अभवत् ) ह्या संसारामध्यें आल्यावर ( ततः ) सचेतन आणि अचेतन जी सृष्टि तिला अनुलक्षून ( साशनानशन अभि ) नानाप्रकारची रूपें घेऊन ( विष्वङ ) हा [ह विश्व ] व्यापून राहतो ( व्यक्रामत्-व्याप्तवान् ); ह्म० अचेतन, पर्वतादि पदार्थ, व सचेतन, मान- वादि प्राणि ह्यांचीं स्वरूपें धारण करून हा विश्वास व्यापून टाकतो.