पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६९ लावावयाचा आहे. ईश्वर हें कारण आहे व जग हें कार्य आहे ह्मणजे जग हैं ईश्वराचें कांहीं वेळे पुरतें बनलेलें स्वरूप आहे. जग हें कांहीं त्याचें खरें स्वरूप नव्हे, व हें स्वरूप बनण्यास मुख्य कारण अन्न हैं होय. ऋचा ३री:- महिमा - स्वकीयसामर्थ्यविशेषः. अतः ह्या महिम्याहूनही. अमृतं = विनाशरहितं सत्, विनाशरहित होत्सातें. दिवि द्योतनात्मके स्वप्रकाशस्वरूपे. मराठी अर्थ - [ हें जें वर्तमान, भूत व भावी जग आहे ] हा एवढा [ सर्व ] त्या पुरुषाचा महिमा आहे. परंतु वास्तविक रीतीनें तो या महिम्या- हूनही ० ह्या विश्वाहूनही फार अधिक ( अतो ज्यायाँश्च ) आहे. [ तो कसा ह्याचेंच स्पष्टीकरण पुढील दोन चरणांत केले आहे. ] हा सर्व जो भूतसमुदाय आहे तो [ विश्वा भूतानि ] ह्या पुरुषाचा एक पाद ह्मणजे 1⁄2 भाग आहे. त्याचे [ अवशिष्ट ] तीन पाद ह्म० तीन अंश अविनाशी असून (अमृतं) द्योतनात्मक जें त्याचें ब्राह्मस्वरूप त्यामध्ये (दिवि ) वर्ततात. " सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म" असें तर ब्रह्माचें वर्णन आहे. आणि येथे त्याला विभाग कल्पून त्यांची वांटणीही करून टाकिली आहे. मग ब्रह्माचें अनन्तत्व खरें नाहीं कीं काय ? ह्या शंकेचें समाधान असें आहे कीं जरी खरोखर विचार केला असतां ब्रह्माची इयत्ता करितां यावयाची नाहीं, तथापि, त्याच्या ब्रह्मस्वरू- पापेक्षां हैं जग फारच अल्प आहे असें दर्शविण्याकरितां ह्या ऋचेमध्यें जगत् हें त्याचा चौथा भाग आहे व त्याचें ब्रह्म स्वरूप जगापेक्षां तिप्पट मोठे आहे •असें सांगितले आहे. भगवद्गीतेंतही एके ठिकाणी ब्रह्माला असेच अंश कल्पिले आहेत - " विष्टभ्याहमिदं कृत्स्नं एकांशेन स्थितो जगत्. ' دو अध्या० १०.४२.