पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इदं = इदं वर्तमानं जगत्- उत= अपि च. अमृतत्वस्य = देवत्वस्य. यत् यस्मात् कारणात्. १६८ अन्नेन=प्राणिनां भोग्येन अन्नेन निमित्तभूतेन. येथें पाठासंबंधानें तुकाराम तात्यांच्या व पीटर्सनच्या प्रतीत फरक आहे. परंतु तो मुळींच लक्षांत घेण्याजोगा नाहीं. अतिरोहति = स्वकीयां कारणावस्थां अतिक्रम्य परिदृश्यमानां जगदवस्थां प्राप्नोति. त्याच्यापुढे पुढील वाक्य अध्याहृत घ्यावें-- वस्तुत्वं. तस्मात्प्राणिनां कर्मफलभोगाय जगदवस्थास्वीकारात् नेदं तस्य मराठी अर्थ - वर्तमानकाळी जें हैं जग दिसत आहे तें सर्व (इदं सर्व) [ तसेंच ] जें भूतकाळीं होतें ( यद्भूतं ) आणि जें भविष्यकाळी होणार आहे, ( यच्च भव्यं ) तें सर्व हा पुरुषच आहे. आणखी शिवाय हा अमृतत्वाचा ह्म० देवत्वाचा स्वामी आहे, झ० देवत्वही ह्यापासूनच प्राप्त होतें. [ प्राण्यांच्या उत्पत्तीला कारणीभूत असें जें ] अन्न त्यानें ( अन्नेन ), ज्या अर्थी ( यत् ) हा [ पुरुष ] आपली कारणावस्था सोडून देऊन ह्या दृश्यमान जगद्रूपानें नटतो ( अतिरोहति ) [ त्या अर्थी हैं जग कांहीं त्याचें खरें स्वरूप नव्हे ]. कारण आणि कार्य ह्रीं एकच आहेत हा वेदान्त्यांचा एक प्रमुख सिद्धान्त आहे. मृत्तिका हैं कारण आणि घट हें कार्य. परंतु ज्याला आपण घट ह्मणतों तो वास्तविक पाहूं गेल्यास काय आहे ? मृत्तिकेलाच दिलेला एक विशिष्ट आकार आहे. घट ही कांहीं मृत्तिकेपासून भिन्न वस्तु नाहीं. तर यावरून हैं उघड आहे की घट हा मृत्तिकेचा, कांहीं नियमित वेळेपुरता बनलेला, आकार आहे व घटाचा शाश्वत आकार ह्मणजे मृत्तिकाच होय. हाच नियम ईश्वरास