पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६७ तुकाराम तात्यांचा आणि मोक्ष मूलरचा ह्या पदावरील भाष्याचा पाठ एकच आहे. तो पीटर्सनचे प्रतींत पहावा. मराठी अर्थ - [ ज्योति, गौ आणि आयु असे] जे तीन यागविशेष आहेत त्यांप्रत ( त्रिकद्रुकेभिः = त्रिकद्रुकान् ) [ त्यांचे रक्षणाकरितां ] यम येतो ( पतति ). सहा ज्या भूमि [ आणि ) सर्वात अतिशय मोठे असें जें [ हैं जग ] त्यांप्रत [ ही ] यम येतो. त्रिष्टुम्, गायत्री इत्यादि जे छंद आहेत ह्म० जीं वृत्त आहेत ते सर्व छंद ह्म० तीं सर्व वृत्ते यमाचे ठायीं [ ऋत्विजांनीं स्तोत्ररूपानें ] ठेविलीं; आहेत. मंडल १० सूक्त ९०. ( पीटर० नं० ३०) ऋचा १ ली: - विश्वतः सर्वतः. वृत्वा = परिवेष्टय. अत्यतिष्ठत्-अतिक्रम्य व्यवस्थितः. दशांगुलं = दशांगुलपरिमितं देशं दशांगुलमित्युपलक्षणं. ब्रह्माण्डाद्वहिरपि सर्वतो व्याप्य अवस्थितः इत्यर्थः दशांगुले ह्म० मोजून दहाच अंगुळे घ्यावयाची नाहींत. तर ब्रह्माण्ड सर्व व्यापूनही हा आणखी बाहेर उरलाच आहे असा अर्थ घ्यावयाचा. मराठी अर्थ - [ विराट् नांयाचा ] जो पुरुष आहे त्याला अनन्त मस्तकें, अनंत नेत्र व अनन्त चरण आहेत. ह्या भूमीला सर्व बाजूंनी व्यापून हा आणखी जास्त उरलाच आहे. ऋचा २ री:-- चवथ्या चरणासंबंधानें वाद आहे. ह्मणून सायणाचार्यांचा अर्थ नीट लक्षांत आणावा.