पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६६ मराठी अर्थ - घृतयुक्त असा हवि यमाला द्या ( जुहोत - जुहुत) व यमाची पूजा करा ( प्रतिष्टत ). आह्मी पुष्कळ जगावें ह्मणून (प्रजीवसे), सर्व देवांमध्ये (देवेषु ) यम [च] आह्मांला दीर्घ आयुष्य देवो ( आयमत् ). ऋचा १५ वी :- मधुमत्तमं - अतिशयेन मधुरं . हव्यं = पुरोडाशादिकं हविः . जुहोत - जुहुत. इदं = प्रत्यक्षं यथा भवति तथा. पूर्वजेभ्यः=सृष्ट्यादौ उत्पन्नेभ्यः, सृष्टीच्या आरंभी उत्पन्न झालेल्या. पूर्वेभ्यः=अस्मभ्यः पूर्वभाविभ्यः. जे सृष्टीच्या आरंभी उत्पन्न झाले ते अर्थातच आमच्या पूर्वी उत्पन्न झालेले आहेत हे उघड आहे. पथिकृद्भयः=शोभनमार्गकारिभ्यः, चांगला मार्ग घालून देणा-या . मराठी अर्थ - अतिशय मधुर अशा हवीचें. ( मधुमत्तमं हव्यं ) यमरा- जाला हवन करा (जुहोतन ). सृष्टीच्या आरंभी जें उत्पन्न झाले ( पूर्वजेभ्यः ) [ व ह्मणून अर्थात् ] आमच्यापूर्वी जे जन्मास आले ( पूर्वेभ्यः ) [आणि] ज्यांनी सर्व लोकांस चांगला मार्ग घालून दिला ( पथिकृन्द्यः ) अशा ऋषींना हा माझा प्रत्यक्ष नमस्कार असो. ऋचा १६ वीः - लक्षपूर्वक वाचावी. त्रिकद्रुकेभिः=त्रिकद्रुकान्, ज्योतिगौरायुरिति त्रयो यागविशेषाः उच्यन्ते तान. द्वितीयार्थे तृतीया एषा. ज्योति, गौ आणि आयु ह्या नांवाचे तीन याग आहेत, त्यांना त्रिकद्रुक असें ह्मणतात. पतति = प्राप्नोति. षट् उवः=पसंख्याकाः उव: भूमी:. एकमित् वृहत्= एकमेव महत् [ जगत् ] .