पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६५ मात्रांवर लक्ष ठेवून [ सर्वत्र] परिभ्रमण करीत असतात (जानान् अनुचरतः ). त्यांनी (तौ ) ह्या कर्माचे योगानें ( इह ) आज ( अद्य) ह्या मृताला (अस्म- भ्यं ), त्यास सूर्याला पहातां यावे ह्मणून ( सूर्याय दृशये), पुन्हां कल्याणकारक ( भद्रं) असा प्राण (असुं ) दिला ( दाताम् = अदत्ताम् ). वरील ऋचेंतील श्वानांचें वर्णन डिटेक्टिव्हांना कसें बरोबर लागू पडतें हैं पहाण्याजोगे आहे. डिटेक्टिव्हांच्या नाकपुड्याही नेहमी फुगविलेल्याच असतात ऋचा १३ वी:- यमं ह = यममेव. श्रुतिस्मृति पुराणाभिज्ञाः पुरुषाः तौ प्रख्यापयन्ति. अग्निदूतः --- हैं यज्ञाचें विशेषण आहे. अग्निदूर्तः यस्मिन्यज्ञे सोऽयमग्निदूतः. अग्नेदूर्ततत्वमन्यत्रान्नातम्. ज्या यज्ञामध्यें अग्नि हा देवांचा दूत होत असत यज्ञ अग्नि हा देवांचा दूत आहे असें वर्णन आहे. अरंकृतः=बहुभिर्दव्यैरलंकाररूपैर्युक्तः. मराठी अर्थ - [ हैं ऋत्विजहो ! ] यमाकारतां सोमरस पिळा. यमाला हवि द्या. ज्यांमध्ये अग्नि हा देवांचा दूत होत असतो (अग्निदूतः ) [व] जो नानाप्रकारच्या द्रव्यांनी अलंकृत केलेला आहे ( अरंकृतः ) असा [ जो हा आमचा ] यज्ञ तो यमाप्रतच्च ( यमं ह) जाईल ( गच्छति ). ऋचा १४ वीः जुहोत = जुहुत. - प्रतिष्ठत = उपतिष्टध्वं. “ यमं " हैं येथे अध्याहृत घ्यावें यमाची उपासना करा हा अर्थ. देवेषु देवेषु मध्ये, सर्व देवांमध्ये. आयमत्= प्रयच्छतु. प्रजीवसे प्रकृष्टजीवनार्थ, आह्मी पुष्कळ जगावें ह्मणून. =