पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६४ अनमीवं = रोगाभावं, निरोगीपणा. धेहि = संपादय, दे. मराठी अर्थ - हे यमा ! जे तुझे श्वान [ तुझ्या गृहाचें] संरक्षण कारतात ( रक्षितारौ ), जे मार्गाची राखण करितात ( पतिरक्षी ) [व] ज्यांचे- वर्णन [ श्रुतिस्मृतिपुराणाभिज्ञ ] मनुष्यांनी केलेले आहे (नृचक्षसौ ] अशा तुझ्या श्वानांच्या स्वाधीन, हे यमराजा, ह्या प्रेताला ( एनं ) [ त्याचें रक्षणं होण्यासाठीं ], कर ( परिदेहि ), आणि ह्याचें कुशल (स्वस्ति) कर ( धेहि ) व ह्याला निरोगीपणाही (अनमीवं ) दे ( धेहि ). ऋचा १२ वी :- उरूणसी= दीर्घनासिकायुक्तौ, मोठमोठ्या नाकपुड्यांनी युक्त. असुतृपौ=परकीयान्प्राणान्स्वीकृत्य तैस्तृप्यन्तौ, लोकांचे प्राण हरण त्यांवर तृप्त होणारे. उदुम्बलौ = उरुबलौ, महासामर्थ्यवान. , जनान् अनुचरतः प्राणिनः लक्षीकृत्य सर्वत्र चरतः, प्राणिमात्रांना अनुलक्षून परिभ्रमण करितात. दृश = दर्शनार्थ. सूर्याय = सूर्यस्य. दाताम् अदत्ताम्. अद्य= आज. इह = ह्या कर्माचे ठायीं. भद्रं = समीचीनं. हें असूचें विशेषण. मराठी अर्थ - ज्यांच्या नाकपुड्या फार मोठ्या आहेत ( उरूणसौ ), लोकांचें प्राण हरण करून त्यांवर जे तृप्त होतात (असुतृपौ ), ज्यांचें बल फार मोठे आहे (उदुम्बल), [व] जे यमाचे दूत आहेत, असे [ते श्वान ] प्राणि-