पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६३ ऋचा १० वीः- अतिद्रव=अतिक्रम्य गच्छ, अतिक्रमून जा, ओलांडून जा. वारमेयौ=सरमानाम काचित्प्रसिद्धा देवशुनी तस्याः पुत्रौ. चतुरक्षौ=उपरिभागे पुनरपि अक्षिद्वयं ययोस्तादृशौ. साधुना पथा समीचीनेन मार्गेन. यमाचे जे दोन श्वान आहेत ते प्रेताला बाधा करितात. ह्मणून त्यांना चुकवून चांगल्या मार्गानें प्रेताला घेऊन जा अशी अम्मीची प्रार्थना केली आहे. अथ - शोभनमार्गेण गमनानन्तरं. सुविदत्रान् = सुष्ठुभिज्ञान्, जे तुला लवकर ओळख देतील अशा. उपेहि=उपगच्छ. सधमादं = सहर्ष. मराठी अर्थ - [ हे अग्ने ! ] चार डोळ्यांचे [ व चित्रविचित्र वर्णा- `चे ( शबलौ ) जे सरमानामक देवशुनीपासून उत्पन्न झालेले ( सारमेयौ ) [ यमाचे ] दोन श्वान आहेत त्यांना चुकवून चांगल्यामार्गानें [ साधुना पथा ) जा ( अतिद्रव ). नंतर ( अथ ) जे [ पितर ] यमासहवर्तमान ( यमेन ) हर्षाचा अनुभव घेत (सधमादं ) आनंदांत असतात ( मदन्ति ) [ आणि ] ज तुला लवकर ओळख देतील ( सुविदत्रान् ) अशा पितरांसंनिध जा (उपेहि ). ऋचा ११ वीः रक्षितारौ यमगृहस्य रक्षको. पथिरक्षी - मार्गस्य रक्षकौ. नृचक्षसौ–मनुष्यैः ख्याप्यमानौ; मनुष्यांकडून वर्णन केले जाणारे. ताभ्यां = ताभ्यां श्वभ्यां, त्या श्वानांना. अस्मै प्रेताय. स्वस्ति-क्षेमम्.