पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६२ [ त्रियमान नांवाच्या ] गृहाप्रत ( अस्तं ) तूं ये ( एहि ) [व] तेजस्वी अशा शरीरानें (सुवर्चा: तन्वा ) तूं युक्त हो ( संगच्छस्व ). ऋचा ९ वी :- विसर्पत=इदं स्थानं परित्यज्य नानाभावेन दूरतरं देशं गच्छत इत्यर्थः, नानारूपें धारण करून दूर अशा देशांना पळून जा. अस्मै = मृतयजमानस्य अर्थाीय, ह्या मृतयजमानाकरितां. लोकं इदं दहनस्थानं. अक्रन्=[ यमस्य आज्ञया ] आन्त्रकुर्वन् [ यमाच्या आज्ञेनें ] तयार केलें आहे. अद्भिः=अभ्युक्षणोदकैः. व्यक्तं = संगतं [ शुद्धिनिमित्तैः कालोदकादिभिः ] कालोदकादिभिः ] शोधितं इत्यर्थः, [दिवसांनी, रात्रींनीं, व अभ्युक्षणोदकानें ] युक्त ह्मणजे [ शुद्धीला कारणीभूत असा जो रात्रीचा व दिवसाचा काल, व अद्भुक्षणोदक त्यानें ] शुद्ध झालेलें. अक्तुभिः = रात्रिभिः. अवसानं = दहन स्थानं. अस्मै = मृतयजमानस्य अर्थाीय. ददाति=दत्तवान्. मराठी अर्थ - [मृतयजमानाच्या ह्या दहनस्थानापासून [ अत: J [ हे पिशाचादिक हो ! ] तुह्मी निघून जा ( अपेत ), दूर व्हा (वीत ) व दूरवर देशाला पळून जा ( विसपत च ). ह्या मृताकरितां (अस्मै ) हैं दहन- स्थान ( एतं लोकं ) [ यमाच्या आज्ञेवरून ] पितरांनी तयार केलें आहे ( अक्रन् ). दिवसाचा व रात्रीचा जो काल त्या काळाच्या योगानें ( अहोभिः अक्तुभिः व अभ्युक्षणोदकाच्या योगानें ( अद्भिः ) शुद्ध झालेल ( व्यक्तं ) हैं दहनस्थान (अवसानं ) यमाने ह्या मृत पितराला (अस्ने) दिल आहे (ददाति ) -