पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मदन्ता = मदन्तौ, तृप्यन्तौ. पश्यासि = पश्य. देवं द्योतमानं. १६१ मराठी अर्थ - [ हे मृत पितरा ! ] ज्या स्थानाप्रत ( यत्र ) आमचे पूर्वज (पूर्वे ) पितर गेले ( परेयुः ) ( त्या स्थानाप्रत ) तूं अनादिकालापासून चालत आलेल्या (पूर्व्येभिः) मार्गांनी (पथिभिः ), लवकर लवकर जा ( प्रेहि प्रेहि). [ तेथे गेल्यावर ], अमृतान्नाने ( खधया) तृप्त होणारे ( मदन्ता ) असे आपले उभयतां स्वामी (उभा राजाना) जे यम व देदीप्यमान (देव) वरुण त्यांना तूं पहा (पश्यासि ). ऋचा ८ वीः- - इष्टापूर्तेन=श्रौतस्मार्तदानफलेन. परमे = उत्कृष्टे. व्योमन् व्योमनि, स्वर्गाख्ये स्थाने. हित्वाय = हित्वा, परित्यन्य. अवघं पापं. अस्तं = त्रियमानाख्यं गृहं. एहि = आगच्छ. तन्वा=स्वशरीरेण. सुवर्चा = सुवर्चसा. तृतीयार्थे प्रथमा. मराठी अर्थ - [ नंतर ] उत्कृष्ट अशा (परमे ) स्वर्गामध्ये ( व्योमन् ) तूं पितरांप्रत (पितृभिः), यमाप्रत ( यमेन ) [व] तूं जीं कांहीं [ यागादिक व वापीकूपादिक ] धर्मकृत्यें केलीं असशील त्यांच्या फलाप्रत ( इष्टापूर्तेन ) प्राप्त हो ( संगच्छस्व ), ह्म० पितरांना भेट, यमाला भेट व तुझ्या सत्कर्माचें फळ तुला मिळो. तदनंतर ( पुनः ) सर्व पातकांपासून मुक्त होऊन ( हित्वाय अवयं )