पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५९ ऋचा ५ वी:- यज्ञियेभिः = यज्ञयोग्यैः. वैरूपैः=विविधरूपयुक्तैः. वैरूपसामप्रियैर्वा; विविध रूपांनी युक्त अथवा वैरूप साम ज्यांना प्रिय आहे त्या. इह-अस्मिन्यज्ञे. मादयस्व = [ यजमानं ] हर्षय. हुवे आह्वयामि. आनिषद्य=उपविश्य. ह्याच्यापुढे " यजमानं हर्षयतु " हे अध्याहृत घ्यावें. -- वैरूप साम ज्यांना प्रिय आहे त्यांसहवर्तमान ये ( आगहि ) [ यजमानाला हर्ष दे ]. जो मराठी अर्थ - हे यमा ! यज्ञाचा मान देण्यास योग्य ( यज्ञियेभिः = यज्ञयोग्यैः ) [ आणि ] विविधरूपांनी युक्त अथवा (वैरूपैः) असे जे अंगिरा [ नांवाचे पितर ] [ आणि आल्यावर ] ह्या यज्ञाचे ठायी (इह ) [ विवस्वान् ] तुझा पिता आहे त्या विवस्वानाला ( अस्मिन् यज्ञे ) मी बोलावितों ( हुवे ). [ त्या ] बहवर बसून ( बर्हिषि आनिषद्य ) तो [ यजमानाला हर्षे देवो ]. ऋचा ६ वी:- - अंगिरस : = अंगिरोनामकाः [ पितरः ]. ( विवस्वन्तं ) ह्या यज्ञामध्यें नवग्वाः–अभिनवगमनयुक्ताः, नूतनवत्प्रीतिजनकाः इत्यर्थः, नुक्केच गेले आहेत अशा तन्हेनें प्रीति करणारे. अथर्वाणः = अथर्वनामकाः [ पितरः 1. भृगवः=भृगुनामकाः [ पितरः ]. सोम्यासः सोमं अर्हन्तीति सोम्याः. सुमता=अनुग्रहयुक्तायां बुद्धौ. यज्ञियानां यज्ञार्हाणां तेषां.