पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५८ स्थानें, तुष्ट होतात [आणि] दुसरे झ० पितर " स्वधा" झटल्याने तुर होतात ( मदन्ति = हृष्यन्ति . ) ऋचा ४ थी:- - इमं हें दर्शक सर्वनाम प्रस्तराचें आहे. प्रस्तरं=विस्तीर्णं यज्ञविशेषं. आसीद = आगत्य उपविश. अंगिरोभिः =अंगिरा नावाच्या [ पितरांबरोबर. ] संविदानः = ऐकमत्यं गतः. तूं हि = यस्मात् एवं तस्मात्, ज्या अर्थी तूं यावेंस अशी आमची इच्छा आहे त्या अर्थी. कविशस्ताः = विद्वद्भिः ऋत्विभिः प्रयुक्ताः, विद्वान् ऋत्विजांनी झटलेले.. हें मंत्राचें विशेषण. एना = एतेन. 'हें हविषा हवीनें “तुष्ट होऊन " हें त्यापुढे अध्याहृत घ्यावे. मादयस्व = यजमानं हर्षय. मराठी भाषान्तर - अंगिरानामक पितरांबरोबर (अंगिरोभिः पितृभिः) अतिशय स्नेह बाळगिणारा ( संविदानः = ऐकमत्यं गतः ) जो तूं तो हे यमा ! तूं [आमच्या ] त्या यज्ञाप्रत ( इमं प्रस्तरं ) येऊन स्वस्थानापन्न हो ( आसीद = आगत्य उपविश ). [ आणि ] ज्या अर्थी असें [ आमचे मनांत] आहे त्या अर्थी विद्वान् ऋत्विजांनी ह्यटलेले ( कविशस्ताः ) मन्त्र तुला [ आमच्या यज्ञाकरितां येथें ] आणोत ( आवहन्तु ): ह्या हवीनें [ संतुष्ट होत्साता ] तूं [ यजमानाला ] हर्ष दे (मादयस्व ).