पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५४ स्थन = [ हवींषि भादातुं ] भवथ, [ हविर्ग्रहण करण्या करितां येथें ] आलां आहां. विश्वे सर्वे वैश्वानराः विश्वे सर्वे नरः कर्मनेतारः अववदयः यस्य स विश्वानरः यज्ञः तस्मिन्सोमादिहवींषि स्वीकर्तुं भवाः प्रादुर्भूताः ; यद्वा वैश्वानरः अग्निः देवानां तन्मुखत्वात् तस्य संबंधिनः. हें देवाचें विशेषण आहे. ह्या शब्दाची व्युत्पत्ति दोन तऱ्हेने करितां येते—(१) विश्व ह्म० सर्व, जे नर ह्म० यज्ञाचे नेते अध्वर्यु वगैरे ते ज्यामध्यें असतात तो विश्वानर ह्म० यज्ञ त्या यज्ञामध्यें हवि घेण्या- करितां जे येतात त्यांना वैश्वानर ह्मणावें. अथवा, (२) विश्वानर ह्म० अग्नि. अग्नि हा देवांचें मुख आहे. ह्मणून त्यावरून देवांना वैश्वानर हैं नांव पडलेले असावें. उत= अपि च शर्म= सुखं, सर्व शृणाति हिनस्ति दुःखमिति शर्म सुखं. सप्रथः सर्वतः प्रसिद्धं, सर्वत्र पृथुतमं वा गवे=[ अस्मदीयेभ्यः यज्ञसाधनभूतभ्यः ] गोभ्यः. मराठी अर्थ - विश्वानर ह्म० यज्ञ त्यामध्यें हवि घेण्याकरितां जे [तुझी ] प्रादुर्भूत होतां अथवा विश्वानर ह्म० अनि हा ज्या तुमचें मुख आहे असे (वैश्वानराः ) आणि जे [ तुह्मी ] देदीप्यमान आहांत ( देवाः ) असे हे - सर्व (विश्व) [ देवह 1] जे [ तुह्मी ] ( ये ) ह्या [ आमच्या ] यज्ञामध्यें ( इद्द ) [ हवि घेण्याकरितां ] आलां आहांत ( स्थन ) [ ते तुह्मी ] आह्मांला (अस्मभ्यं ) . सर्वत्र प्रसिद्ध अथवा पुष्कळ असें ( सप्रथः ) सुख ( शर्म ) द्या ( यच्छत ) [ व त्याचप्रमाणें आमच्या यज्ञाला साधनीभूत अशा ] गाईना [ व आमच्या ] अश्वांनाही सुख द्या (शर्म यच्छत ).