पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५१ ( मधुमत्तमं ) हवि [ हे ऋत्विजहो! तुह्मी ] द्या (जुहोत = जुहुत). [आणि] तो [ पर्जन्य ] अगदी नियमित रीतीनें ( संयतं = सम्यक् नियतं यथा भवति तथा ) अन्न (इळां ) देवो ( करत् करोतु, ददातु ). मंडल ८ सूक्त ३०० ऋचा १ लीः - ( पीटर. नं. २८ ). वः = युष्माकं मध्यें, तुमच्यामध्ये. अर्भकः=शिशुः. देवासः = हे देवाः. न हि वो अस्ति अर्भकः देवासो न कुमारकः - किन्तु सर्वे यूयं सवयसः नित्यतरुणाः भवथ. विश्वे = सर्वे. सतोमहान्त = सर्वस्मात् विद्यमानात् पृथिव्यामपि ये महान्तः ते सतो- महान्तः इत्युच्यन्ते, सर्व विद्यमान वस्तूंपेक्षाही मोठे. मराठी अर्थ - हे देवहो ( देवासः ) ! तुमच्यामध्यें (व:) खरोखर (हि) कोणी अर्भकही नाहीं [व] कोणी कुमारही नाहीं [ तर तुह्मी सर्वच समान वयाचे व तरुण आहोत ]. [ तुझी ] सर्व (विश्वे ) खचित ( इत्) सर्व विद्यमान वस्तूंपेक्षांही मोठे ( सतोमहान्तः ) आहांत. ऋचा २ रीः- इति = इत्थं, अनेन प्रकारेण. स्तुतासः = स्तुताः. असथ=भवथ, यद्वा अथवा [ हवींषि ] कामयध्वम्. रिशादसः-रिशतां हिंसता असितारः, हिंसक [ प्राण्यांचा] पराभव अथवा नाश करणारे.