पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इच्छतु=दातुं इच्छतु. १५० मराठी अर्थ - अंतरिक्षाचा पुत्र ( दिवस्पुत्राय ) [व] जलवृष्टि कर- णारा ( मीळ्हुषे ) जो [ पर्जन्य ] त्या पर्जन्याकरिता पुष्कळ स्तवन करा ( प्रगायत ). तो [ पर्जन्य ] आह्मांला (नः) [ औषधि इत्यादि प्रकारचें ] अन्न ( यवसं ) देण्याची इच्छा करो ( इच्छतु ). ऋचा २ री:- गर्भ-प्रसूतिहेतु बीजं उदकरूपं. कृणोति=करोति.. अर्वतां = अर्वतीनां वडवानी. पुरुषीणां = नारीणां मराठी अर्थ - ओषधि, गाई, घोड्या [व] स्त्रिया त्यांचा गर्भ [ उदक हैं ह्या सर्वांच्या प्रसूतीचें कारण आहे. ] जो पर्जन्य उत्पन्न करितो [ त्या पर्ज- न्याकरितां पुष्कळ स्तवन करा ]. ऋचा ३ री:-- तस्मै इत् तस्मै एव पर्जन्याय. आस्ये=देवानां आस्यभूते अग्नौ. जुहोत - जुहुत. मधुमत्तमं = रसवत्तमं, अतिशय मधुर. इळा=अनं. नः = अस्मभ्यं. संयतं सम्यक् नियतं यथा भवति तथा, अगदी नियत रीतीनें. करत् करोतु, ददातु. मराठी अर्थ - त्या पर्जन्यालाच [हवि पोचावा या हेतूनें] (तस्मै इत् ) [ सर्व देवाच्या ] मुखस्थानीय जो अग्नि त्यामध्यें ( आस्ये ) अतिशय मधुर असा