पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अहं गमम् = अहं गतोस्मि. मृळ = सुखय. सुक्षत्र= शोभनधन. मृळय= उपदयां च कुरु. १४७ मराठी अर्थ -- हे राजा [ वरुणा !] मृत्तिकेच्या केलेल्या (मृन्मयं ) [ तुझ्या ] गृहाला (गृह) मी कधींच गेलों नाहीं ( मैव गमं ) [ तर नेहमी ] सुशोभन, अथवा सुवर्णमय (सु) [ अशाच तुझ्या गृहाप्रत मी गेलो होतों ]. तो तूं हे शोभनयुक्ता ! [ मला.] सुख दे ( मृळ ) [ व ] क्षुल्लक गोष्टीतही [ माझ्यावर ] कृपा कर ( मृळय ). ऋचा २री:- प्रमाणें यत् = यदा. एमि= गच्छामि. प्रस्फुरनिव= शैत्येन प्रविचलन्निव त्वद्भयात्कंपमानः, थंडीनें कुडकुडल्या- तुझ्या भयाने कांपणारा. दृतिर्न= दृतिरिव, भात्याप्रमाणे. ध्मातः = वायुना पूर्णः. अद्रिवः=आयुधवन्. हें संबोधन आहे. मराठी अर्थ - हे आयुधवन्ता ( अद्रिवः ) [ वरुणा !] वायूने भर- लेल्या ( ध्मातः) भात्याप्रमाणें ( दृतिर्न ) जेव्हां (यत्) मी जणूं कांहीं [ थंडीनें कुडकुडल्याप्रमाणें तुझ्या भयानें ] कांपत कांपत जातों (प्रस्फुरभिव यामि ) [ त्यावेळीं ] हे शोभनधनयुक्ता ! इ. इ. ऋचा ३ रीः- ऋत्वः = कर्मणः, कर्तव्यत्वेन विहितस्य श्रौतस्मार्तादिलक्षणस्य; श्रुतिस्मृ- तीने कर्तव्य ह्मणून सांगितलेल्या कर्माच्या.