पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संख्या = सख्यानि, सखित्वानि. सचाव हे = सेवावहे. १४४ यत्=यत्सख्यं. “ सख्यं " हें संदर्भावरून घ्यावें. अवृकं = अहिंस्यं, आत्यन्तिकं. पुरा=पूर्वस्मिन् काले. चित्--चिदिति पूरकः. बृहन्तं=महान्तं. मान=मान्ति अस्मिन्सर्वाणि भूतानि इति मानं सर्वस्य भूतजातस्य परिच्छेदकं इत्यर्थः. स्वधावः = अन्नवन् हें संबोधन आहे. सहस्रद्वारं बहुद्वारं. जगम=गच्छानि, लोडर्थे लिट् लोट्करितां म० Imperative Mood करितां लिट् ह्म० Perfect Tense घातलेला आहे. मराठी अर्थ -तें आपलें ( नौ ) [ पूर्वीचें ] सख्य काय झालें ? पूर्वी (पुरा) जें (यत्) [ आपणांमध्यें ] आत्यन्तिक असें ( अब्रुकं ) [ सख्य ] होतें तें आपण पुन्हां प्रचरांत आणूं (सचावहे ). हे अन्नदात्या वरुणा मोठें वि- स्तीर्ण (बृहन्तं ), सर्व भूतसमुदाय ज्यांत मावतो असे ( मानं ) [ आणि ] ज्याला हजारो दरवाजे आहेत आहेत असें ( सहस्रद्वारं ) जें तुझें घर आहे तेथें मला जाऊं दे ( जगम= गच्छानि ). ऋचा ६ वी:- आपिः=बन्धुः, औरसः पुत्रः. नित्यः=ध्रुवः. आगांसि=अपराधान्. कृणवत्=अकरोत्.