पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४३ " अहां सुदिनत्वे - त्याच्यापुढें अस्थापयत् " हें क्रियापद अध्याहृत आहे. " अह्नां सुदिनत्वे अस्थापयत् " - दिवसानां मध्ये यत्फलत्वेन शोभनदिनत्वं तत्र [ स्तोतारं ] अस्थापयत्, सर्व दिवसांमध्यें एकाद्या दिवसाला सुदिनत्व येण्याला . ज्याच्या फलाच्या अस्तित्वाची अवश्यकता आहे त्या ठिकाणी ह्या स्तोत्याला ठेविलें. उदाहरणार्थ, सर्व दिवसांमध्यें रामनवमीला सुदिनत्व आहे. आतां राम- नवमीला सुदिनत्व येण्याला रामजन्माच्या फलाच्या ह्म० रावणवधाच्या अस्ति- त्वाची गरज होती. रावणवध झाला नसता तर रामजन्माला महत्व आलें नसतें. ह्याच न्यायानें वरुणानें वसिष्टाला सुदिनत्वाचेठाय स्थापन केलें ह्मणजे वसिष्ठाचा दिवस तो चांगला दिवस असें वरुणाने करून टाकिलें. यात् द्यावः गच्छतो दिवसान्. यात् उषासः यातीः उषसोपलक्षिताः रात्रीः. नु= क्षिप्रं. ततनन्= [ सूर्यात्मना ] विस्तारयन्. मराठी अर्थः - खरोखर (ह) वरुणानें वसिष्टाला [ आपल्या स्वतःच्या ] नौकेत ( नावि ) घेतलें (आअधातू ) [ आणि त्याला ] आपल्या रक्षणाच्या [ छाये ] खालीं घेऊन ( अवोभिः ) [ त्या ] ऋषीला [ त्यानें ] चांगली कृत्ये करण्याची शक्ति [ व इच्छा ] दिली ( स्वपां चकार ). [ त्या ] मेधावी (विप्रः ) ] वरुणानें [ स्तवन करणाऱ्या वसिष्ठाला ], जाणारे दिवस . (यात् द्यावः ) [व] जाणाऱ्या रात्री ( यात् उषासः) लवकर (नु) उत्पन्न करीत ( ततनन् ), सर्व दिवसांमध्यें उत्तम दिवसत्वाचे ठायीं ( अह्नां सुदिनत्वे ) [ स्थापन केलें ]. ऋचा ५ वी:- त्यानि तानि पुरातनानि. नौ-भावयोः.