पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४२ स्नुभिः=गन्त्रीभिः [ अन्याभिरपि ] नौभिः. बराव = वर्ताव है. प्रेखेनौरूपाय दोलायां एव. प्रेखयावहै=[ निम्मोन्नतैस्तरंगैः इतश्च इतश्व ] प्रविचलन्तौ संक्रीडाव है. शुभे= शोभार्थ. कं-कं इति पूरकः, यद्वा क्रियाविशेषणं. कं सुखं यथा भवति तथा इत्यर्थः. मराठी अर्थ - [ वरुण प्रसन्न असतांना ] यत् ह्म० जेव्हां [ मी ] आणि वरुग असे [ दोघेजण ] नावेंत ( नावं; द्वितीया ) बसत असूं (आरुहाव ) [ आणि ] जेव्हां समुद्रं मध्यं ह्म० समुद्राच्या मध्या पर्यंत [ आह्मी आपली नाव ] नेत असूं (प्रेरयाव ); [ आणि ] जेव्हां [ आणखीही दुसऱ्या ] नावांमध्यें बसून (स्नुभिः ) [ आह्मी ] उदकाच्या वरती हिंडत असूं ( अपां अधि च- राव ) [ त्या वेळीं ] शोभेकरितां ( शुभे ) [ आह्मी नौकारूप ] झोपाळ्यावर ( प्रेखे) झोंके घेत, सुख होईल अशा रीतीनें (कं), क्रीडा करूं.. ऋचा ४ थी - कठिण आहे. येथपर्यंत वसिष्ठ ऋषींचें स्वतःला उद्देशून भाषण झालें. आतां, त्यांच्या- करितां वरुणाने काय केलें त्यांचें ऋषि वर्णन करितात. बसिष्ठं ह=वसिष्टं खलु. नावि = स्वकीयायां नावि. आ अधात् = आरोहय तू. ऋषितं ऋषिं. स्वप-स्वपसं शोभनकर्माणं. अवोभिः = रक्षणैः. मुळामध्यें “ स्वपा महोभिः " असें आहे. मोक्षमूलरनें मटलें आहे त्याप्रमाणे सायणाचार्यांचा पाठ " स्वपां अवोभिः " असा दिसतो. विप्रः मेधावी. हें वरुणाचें विशेषण आहे.