पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४१ स्वः = सुखकरं. हें अन्धाचें ह्म० अन्नाचे विशेषण. यत्=यदा. अश्मन्=अश्मनि, [ अभिषवार्थे ] पाषाणे. ह्यापुढे " अवस्थितं " हें अध्याहृत आहे. अवस्थितं = अभिषुतं ह्म० पिळून काढलेला. अधिपाः= अधिकं पाता. उ- उ इति पूरक:, an expletive. अन्धः=[ सोमलक्षणं ] अन्नं, [ सोमरूप ] अन्न. मा=मां. वपुः शरीरं [ स्वकीयं ]; वपुरिति रूपनाम, प्रशस्तं रूपं वा. दृशये अभिनिनीयात् = दर्शनार्थ अभिप्रापयेत्, दृष्टीस पाडील, दाखवील. मराठी अर्थ - आतांच ज्या मला ह्या वरुणाचे फार लवकर ( नु) दर्शन घडलें तो ( दर्शनं जगन्वान् = दर्शन घडलेला ) [ मी ] वरुणाच्या ( वरु णस्य ) ज्यालासंघाची ( अमेरनीकं ) स्तुति करीन ( मंसि= स्तवानि ). यत् झ० जेव्हां अश्मन् ह्मणजे पाषाणावर [ पिळून काढलेले आणि ] स्वः ह्म० सुखकर असें अंध: ह्म० [ सोमरसरूपी ] अन्न [ वरुण] तृप्ति होईपर्यंत पिईल ( अधिपाः ) [ तेव्हां तो आपलें ] शरीर ( वपुः ) माझ्या दृष्टीस पाडील ( दृशये मा अभिनिनीयात् ). ऋचा ३री:- यत् = यदा. आरुहाव = आरूढौ बभूविव. समुद्र मध्यं = समुद्रस्य मध्यं. प्रेरयाव - प्रकर्षेण गमयाव. अधि - ह्याचा अन्वय “ अपां " या पदाबरोबर. अपां अधि-उदकानां उपरि [ चराव ].