पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१३९ क्षेमे= प्राप्तस्य रक्षणं क्षेम: तस्मिन्. शमु= [ उपद्रवाणां ] शमनं एव. योगे अप्राप्तस्य प्रापणं योगः तस्मिन्. स्वस्तिभिः = अविनाशैः. मराठी अर्थ - हे [ आपल्या स्तोत्य ना ] अन्नाची समृद्धि करणाऱ्या ( स्वधावः ) वरुणा ! ह्या स्तुतीला ( अयं स्तोमः ) [ तुझ्या ] हृदयामध्यें (हृदि) जागा मिळो ( उपश्रितः अस्तु ). जी [ इच्छित गोष्ट ] आह्मांला प्राप्त झाली आहे तिच्या रक्षणासंबंधानें ( नः क्षेमे ) [ सर्व उपद्रयांचे ] शमन असो (शं अस्तु) [व] जी [ इच्छित गोष्ट ] आह्मांला [ अजून ] प्राप्त भाली नाहीं ती प्राप्त करून देण्यासंबंधानें [ ही सर्व उपद्रवांचे ] शमनच (शं उ ) असो (अस्तु). [ हे वरुणादि देवहो ! ] आमच विनाश न होऊं देतां ( स्वस्तिभिः ) तुह्मी ( यूयं ) आमचे (नः) सदोदित (सदा) पालन करा (पात). ऋचा १ ली: -- मंडल ७ सूक्त ८८. ( पीटर० नं० २५ ) ऋषि वसिष्ठ आपल्याशीच भाषण करितात- शुन्ध्युवं शोधयित्रीं, यद्वा स्वतः एवं शुद्धां. हें मतीचे विशेषण. प्रेष्ठां प्रियतमां. मर्ति=मननीयां स्तुतिं. मीळ्हुषे = सेक्त्रे, कामानां वर्षित्रे. प्रभरख = प्रहर, प्रापय . ईम् एनम्. ह्याचा अन्वय "सूर्य" ह्या पदाबरोबर. "सूर्य" हें अध्या- हृत आहे.