पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३८ गृत्सं-स्तोतारं. राये धनाय, धनप्राप्त्यथ. कवितरः प्राज्ञतरः देवः. जुनाति = जुनातु, प्रेरयतु. मराठी अर्थ - ज्याप्रमाणे सेवक आपल्या धन्याची ] नीट रीतीनें सेवा करितो त्याप्रमाणें [ सर्व कामनांच्या फलाचा ] वर्षाव करणारा (मीळ्हुषे ) दाना देगुणयुक्त, [ व जगताचें] भरण करणारा जो [ वरुण] त्याची, मी, [ त्याच्या प्रसादानें ] निष्पाप होत्साता ( अनागाः ), तो अगदी संतुष्ट होईप- र्यंत (अर = अलं, पर्याप्तं, ) [ सेवा ] करीन ( कराणि ). अज्ञानी जे [ आह्मी ] स्यांना, ( आंचतः ) [ आमचा ] खामी ( अर्य: ) [ तो ] [ वरुण ], देव ज्ञान देवो ( अचतयत्=चेतयतु ). प्रज्ञावान् पुरुषांमध्ये श्रेष्ठ असा ( कवितर: ) जो [ वरुण ] तो [ आपल्या ] स्तोत्यांची ( गृत्सं ), धनप्राप्तीकरितां (राये ) प्रेरणा करो (जुनाति = जुनातु, प्रेरयतु ) झ० आपल्या स्तोत्याला वरुण पुष्कळ धन देवो.' ऋचा ८ वीः - अयं -- ह्याचा अन्वय " स्तोमा " बरोबर. तुभ्यं = त्वदर्थ. ह्यापुढे “ क्रियमाण: " हें अध्याहृत घ्यावें. " तुझ्याक• रिता केला जाणारा [ स्तोम ] " स्वधावः = अन्नवन् हें संबोधन आहे. हृदि=[ त्वदीये ] हृदये. स्तोमः स्तात्रं. उपश्रितः = उपगतः, समवेतः. चित्-चिदिति पूरक:. शं= [उपद्रवाणां] शमनं.