पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

" १३७ उत्पन्न होईल व ह्मणूनच - त्या जन्मांत तर पातकाची पूर्वीपेक्षा जास्त आवड अशा रीतीनें अधःपतन होत होत तो रसातळास पोचेल. ईश्वरच मनुष्याला पातकाकडे प्रवृत्त करितो " असें श्रुतीनें झटले • आहे व ह्या श्रुतिपर सायणाचार्यांनी अर्थ लाविला अहे ह्या श्रुतीचा अर्थ नीट समजणार नाहीं ह्मणून एवढा विस्तार येथे केला आहे. ह्या संबंधानेच भगवान् गीतेंत ह्मणतात. - नहि कल्याणकृत्कश्चिद्दुर्गतिं तात गच्छति । प्राप्य पुण्यकृतां शाश्वतीः समाः । शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते । अथवा योगिना- मेव कुले भवति धीमताम् । तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम्। यतते च भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥ अध्यायः ६. ततो ह्या तत्त्वाचा अस्पष्ट उल्लेख बायबलामध्येही सांपडतो. उदा० जुन्या करारामधील " एक्सोडस " ह्या प्रकरणांतील फॅरो आणि मोझेसची गोष्ट पहा. ऋचा ७ वीः- अरं =अलं, पर्याप्तं. दासः भृत्यः. न इव. मीळ्हुषे = सेक्त्रे, कामानां वार्षित्रे. करागि= [ परिचरणं ] करवाणि. यदानादिगुणयुक्ताय [ वरुणाय ]. भूर्णये=जगतो भर्त्रे. अनागाः = अपापः सन्. अचेतयत्=चेतयतु, प्रज्ञापयतु. अचितः = अजानतः [ अस्मान् ], अजाण जे [ आह्मां ] त्यांना. अर्य:- स्वामी.