पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तो १३६ शंका अगदी साहजिक आहे, परंतु प्रस्तुत स्थळी तिचें समाधान करण्याची. कांहीं जरूरी नाहीं. तर आपण हें गृहांत धरून चालूं कीं, ईश्वराची आय सृष्टि कशीही असो परंतु आतां मात्र ही गोष्ट निःसंशय आहे की मनुष्याचे पूर्वजन्मांतील ज्या प्रकारचें कर्म असेल त्या प्रकारचा त्याला उत्तरजन्म* मिळतो. ह्या जन्मांत चांगली वासना धरून जर आपण दुष्कृत्यांत पडलोंच नाहीं तर आपल्याला पुढील जन्म असा येईल की तेथे आपल्याला साहजिकपणेंच सत्कर्माची स्फूर्ति व्हावी. ह्या उलट जर आपण ह्या जन्मीं दुष्कृत्येच करीत राहिलों तर आपल्याला पुढील जन्मीं साहिजकपणचे दुष्कमांची आवड उत्पन्न होईल. अन्य कारणांचा मनुष्याचे स्वभावावर जो परिणाम घडतो बाजूस ठेविला तर ही गोष्ट कोणासही नाकबूल करितां यावयाची नाहीं कीं मनुष्याची स्वाभाभिक प्रवृत्ति ह्मणून कांही असतेच. आपण अगदी लहान मुलांचे उदाहरण घेऊ. ह्मणजे त्यावरून आपणांला असे आढळून येईल कीं कांहीं मुलांचा जन्मत: अंकुरच चांगला असतो व कांहींचा तो जन्मतःच वाईट असतो. आणि, मागील जन्मांतील कृत्यांचा जर आपल्या मनावर कांहीं एक परिणाम नसता आणि प्रत्येक गोष्ट जर इहजन्मांतील कृत्यांवरच अवलंबून असती तर चांगलेपणाने ह्या जगांत वागणे फार सोपें झालें असतें. परंतु आपण पहातों कीं आपण एकादी चांगली गोष्ट करण्याचे मनांत आणावें परंतु आपले मन एक सारखें उलट बाजूस ओढ घेत असतें. त्याकरितांच तर सदाचरणानें वागण्याचा इतका उपदेश व इंद्रियदमनाची इतकी अवश्यकता. मनुष्य उत्तम गतीला अथवा अधोगतीला एकदम अचानक असा कधींच जात नाहीं, तर प्रत्येक जन्मांत थोडाथोडा जात असतो. ईश्वराच्या घरच्या न्यायाला उ- तावीळपणा नाहीं. आज एका मनुष्याला मृत्यु आला आणि त्याने जर दुष्कर्मे केलेलीं असलीं तर ईश्वराचे मनांत त्यास अधोगतीस पोचविण्याचे येऊन तो त्यास असा जन्म देईल कीं, त्यांत त्याची स्वाभाविक आवड पातकाकडे असावी.