पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अनृतस्य = पापस्य. प्रयोता = प्रकर्षेण मिश्रयिता. १३५ स्वप्नैः कृतैरपि कर्मभिःबहूनि पापानि जायन्ते, किमु वक्तव्यं जाग्रतिकृतैः • कर्मभिः पापानि उत्पद्यन्ते इति. अतो ममापराधो दैवागत इति है वरुणा त्वया क्षन्तव्यः इति भावः. मराठी अर्थ - हे वरुणा ! मनुष्य स्वतः ( सः स्वः; स्व: हें नाम घ्यावें. ) [ पातक करण्यास ] उयुक्त होत नाहीं ( न दक्षः ). [ तर ] ती, सुराह्म० दारू, [ अस्थानीं ] क्रोध, [ द्यूताला साधनीभूत असा ] फांसा [आणि] अज्ञान (अचित्तिः ) [ एतत्स्वरूप ह्म० त्यांच्या स्वरूपांत प्रकट होणारी जी ] दैवगति [ ती ] ( श्रुतिः ) [ त्यास पापाकडे प्रवृत्त करणारी ] होय. दुर्बल असा जो [ मनुष्य प्राणी ] त्याच्या ( कनीयसः ) [ मनास पातकाकडे प्रवृत्त करण्यास, त्याच्या ] समीप ( उपारे ) [ त्याचा नियन्ता ह्मणून वास करणारा ] जो श्रेष्ठ [ ईश्वर ] ( ज्यायान् ) तो [ देखील खुद्द, कारणीभूत ] आहे. निद्रासुद्धां (स्वप्रवन ) [ मनुष्याकडून ] पातक घडविणारी होते ( अनृ तस्य प्रयोता ). ईश्वरच स्वतः मनुष्याला पातकाकडे प्रवृत्त करितो. - जर ईश्वराचे ठायीं पक्षपात बुद्धि नाहीं तर मग तो एका मनुष्याला श्रीमंत व एकाला भिकारी कां करितो ? ह्या प्रश्नाचे उत्तर असें आहे कीं, ईश्वर पक्षपाती आहे ह्मणून तो असें करितो असें नव्हे, तर मनुष्याचें जसें पूर्वजन्मा- र्जित कर्म असेल त्याप्रमाणें ईश्वराला त्यास उच्च किंवा नीच स्थितीत जन्मास घालणे भाग पडते. ह्यावर अशी एक शंका निघते कीं, सध्या तुह्मी ह्यणतां तशी स्थिति असेल खरी, परंतु ईश्वरानें ही सृष्टि जेव्हां अगदी प्रथमतः उत्पन्न केली असेल तेव्हां सर्व प्राणी त्याने अगदी सारखे उत्पन्न केले होते कीं नाहीं ! आणि जर केले असतील तर मग पुढे त्यांच्यांत भेद कसा उत्पन्न झाला ? ही