पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३३ चक्रम- कृतवन्तः. तनूभिः=शरीरैः. " अव - ह्या “ अव ” च्यापुढे चवथ्या चरणांतील " सृज " हैं क्रियापद 'व्यावें. परंतु दुसऱ्या चरणांतील "अव" वरून “अवसृज" हैं क्रियापद समजावें. राजन् = राजमान वरुण. पशुतृषं न तायुं=[स्तैन्यप्रायश्चित्तं कृत्वा अवसाने घासादिभिः ] पशूनां तर्पयितारं स्तेनमिव [ चोरी केल्याबद्दल प्रायश्चित्त केल्यावर शेवटीं गवत इत्यादि चारून] पशुंचा आत्मा संतुष्ट करणाऱ्या चोराप्रमाणें (तायुं न ). जर गाईनें तें गवत खाल्ले तर त्या मनुष्याचें प्रायश्चित्त देवानें मान्य केलें असें त्यानें समजावें. परंतु जर गाईनें गवत खाल्लें नाहीं तर मात्र त्या मनुष्याचे प्रायश्चित फुकट गेलें. कारण मग तें देवाला अमान्य झालें असें समजतात - पीटर. दात्रः = रज्जोः, दाव्यापासून. मराठी अर्थ - वाडवडिलांनी केलेल्या ज्या गुन्ह्यांबद्दल आह्मी जबाब दार आहोत ते ( पित्र्या नो दुग्धानि ) आमचे गुन्हे माफ कर ( अवसृज = विमुञ्च ) [ आणि ] जे [ गुन्हे ] आह्मी स्वतः केलेले आहेत ( या वयं तनूभिः चक्रम ) त्यांची [ ही ] क्षमा कर ( अवसृज ). हे श्रेष्ठ [ वरुणा ! ] वासराला जसें दाव्यापासून सोडावें ( वत्सं न दाम्नः ) [ अथवा, चोरीबद्दल प्रायश्चित केल्यावर शेवटी गवत इत्यादि चारून ] पशूंचा आत्मा संतुष्ट कर- णान्या चोराला ज्याप्रमाणें [ चोरीच्या दोषापासून ] ( पशुतृपं न तायुं ) मोकळे करावे त्याप्रमाणें [ मज ] वसिष्ठाला [ पातकापासून ] मुक्त कर. ऋचा ६ वी - अवघड आहे. तो न सः स्वः दक्षः=पुरुषस्य स्वरूपवद्बलं पापप्रवृत्तौ कारणं न भवति; स्वतः (स स्वः) ह्म॰ मनुष्याचें स्वाभाविक वल - मनुष्याची स्वाभाविक बुद्धि- -