पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३२. स्वधावः = तेजस्विन्. त्वा=त्वां. अनेना:= [ प्रायश्चित्तं कृत्वा ] अपापः सन् [ त्या पातकाबद्दल प्रायश्चित्त घेऊन ] पापनिर्मुक्त होत्साता. नमसा = नमस्कारेण, हविषा वा. तुरः त्वरमणः, शीघ्रः. अवेयाम्=अवगच्छेयम्. मराठी अर्थ - ज्या [ अपराधाच्या ] योगानें ( यत्=येन ), [ मी जो तुझा ] स्तोता, त्याला (स्तोतारं), तो [ तुझा ] मित्र असतांना ( सखायं ), मारण्याची इच्छा करितोस (जिघांससि) असा, हे वरुणा ! [ मी तुझा ] कोणता महान् अपराध (ज्येष्ठं आगः ) [ केला ] होता बरें ? हे [ शत्रूंनी] बाधा करण्यास अशक्य [व] तेजस्वी अशा [ वरुणा ] ! ( दूळभ, स्वधावः [ वरुण ] ) ! तो [अपराघ कोणता हैं] मला कथन कर (तत् मे प्रवोचः); [ मग त्याबद्दल प्राय. श्चित घेऊन ] पापनिर्मुक्त होत्साता [मी], त्वरा करून ( तुर: हें " अहं " चें विशेषण आहे. “ अहं ” अध्याहृत आहे ) [तुला ] नमन करीत ( नमसा ) अथवा, तुला हवि अर्पण केल्यावर ( नमसा ) तुजप्रत (त्वां) प्राप्त होईन (अवेयाम् ). ऋचा ५ वी :- द्रोह. दुग्धानि=द्रोहान् [ बन्धहेतुभूतान् ], [ माझ्या बंधाला कारणीभूत झालेले ] पित्र्या = पितृतः प्राप्तानि, वडिलापासून चालत आलेले [द्रोह ]. अवसृज=विमुंच, [ अस्मत्तो ] विश्लेषय. دو नः=अस्मदीयानि. ह्याचा अन्वय " दुग्धानि ” त्या पदाबरोबर. या=यानि [द्रोहजातानि], जीं [ द्रोहजातें] ह्म० जे [द्रोह. ]