पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अहृणानः=अक्रुध्यन्. जुषेत - सेवेत. १३० सुमनाः= शोभनमनस्कः सन् [ अहं ]. मृळीकं = सुखयितारं. अभिख्यम्=अभिपश्येयम्. मराठी अर्थ - [मी ] काय ( उत) आतां आपल्या शरीराशींच बोलावें कीं [ मला ] त्या [ वरुणाबरोबर संभाषण करावयास सांपडेल ? ] [ त्या ] वरुणाचे ठायीं ( वरुणे ) [ मी ] खरोखर केव्हां ( कदा नु ) अंतर्भूत होईन बरें ? काय केलें असतां ( किं- केन हेतुना ) [ तो वरुण ] क्रुद्ध न होतां (अहृणानः ) माझें स्तोत्र अथवा माझा हवि ( मे हव्यं ) ग्रहण करील (जुषेत )? मनांत प्रमुदित होत्साता ( सुमनाः ), [ आपल्या स्तोत्यांस ] सुखामध्यें ठेवणाऱ्या (मृळीकं ) [ त्या वरुणास, मी ] केव्हां बरें (कदा ) पाहीन ( अभिख्यम् ) ? ऋचा ३ री:- पृच्छे=[ त्वां ] पृच्छामि. एनः = पापं. दिदृक्षु=द्रष्टुं इच्छन् [ अहं ]. छान्दसः सुलोपः वास्तविक रीत्या येथे दिदृक्षुः असें रूप पाहिजे होते. जें पातक केल्यामुळे तुझ्या पाशांनीं मी बद्ध झालों आहे तें पातक कोणतें हें मी तुला विचारतो. तर तें कोणतें हें सांग. उपो एमि= उपागाम्. चिकितुषः विदुषो जनान्. विपृच्छम्=विविधं प्रष्टुं, निरनिराळे प्रश्न घालून विचारण्याकरितां. समानं इत्-ममानमेव, एकरूपमेव.