पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५९ [ व रात्री ] नक्षत्राला (ह्म० नक्षत्रसमुदायाला, अशा रीतीनें ) दोन तऱ्हेनें (द्विता ) जो [त्यांस] चालवितो अथवा वर्तवितो ( प्रनुनुदे = प्रेरयति ); आणि [ या ] भूमीला ज्यानें विस्तृत केलें (भूम च पप्रथत् ) ह्म० भूमीचा विस्तार ज्याने वाढविला अशा [ वरुणाचे ] (अस्य) जन्म ( जनूंषि ), त्याच्या महिम्याच्या यांगानें ( महेना = महिना ), लवकर (तु) धैर्यवान् झालेले दिस- तात ( धीरा भवन्ति " भवन्ति " हें अध्याहृत आहे. ) ह्म० वरुण क्षितिजा- वर दिसूं लागण्याबरोबर, स्वमहिम्याच्या योगानें, तो आपलें सामर्थ्य प्रकट कारतो. ऋचा २री:- " उत - उतेति विचिकित्सायाम् उत [ किं ] स्वया तन्वा संवदे [ आहो- स्वित् ] तेन [ वरुणेन सह संवदे ] ! मी काय आपल्या शरीराबरोबरच बोलूं की मला त्या वरुणाबरोबर बोलावयास सापडेल ! " उत ” शब्द ह्या वाक्यांत संशय दर्शवितो. " संवदे " ह्या शब्दाच्यापुढे मुळांत जो " तत् ” शब्द आहे तो " तेन " [ वरुणेन ] ह्या अर्थी समजावा. स्वया तन्वा=स्वीयेन आत्मीयेन शरीरेण. संवदे= सहवदनं करोमि. तत् = तेन [ वरुणेन ] सह. कदा नु =कदा खलु वरुणे अंतः=त्ररुणे देवे अंतर्भूतः. भुवानि= भवानि. دو वरुणे अंतर्भुवानि= वरुणे देवे अंतर्भूतो भवानि, वरुणस्य चित्ते संलमो भवानि इत्यर्थः. किं- केन हेतुना. मे हव्यं = मदीयं स्तोत्रं हविर्वा. ९