पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५

 इन्द्र, वरुण इत्यादि देवतांच्या स्वरूपवर्णनाचें परिशिष्ट जे दुसरीकडे दिले आहे, तें मराठीत देण्याचें प्रथम मनांत होते. परंतु ते संस्कृतामध्ये देण्यांत दोन फायदे वाटले. एक तर त्या शब्दांचा ज्यास जसा अर्थ वाटेल त्यास तसा तो घेतां येईल, व दुसरा असा की संस्कृत वाक्यें आपोआपच तोंडीं बसतील दिलेले उतारे फार आहेत असा कदाचित् कोणाचा आक्षेप निघेल. परंतु पुष्कळ उताऱ्यांना थोडे करण्याची युक्ति फार सोपी आहे. ती कोणाला मुद्दाम शिकविली पाहिजे असें नाहीं.
 त्याचप्रमाणे सूचीही नेहमींच्या पद्धतीने तयार न करितां थोड्या निराळ्या धर्तीवर केली आहे. परंतु तिचा उपयोग ऐन परीक्षेचे वेळी अवघड शब्दांची उजळणी करण्यास नेहमींच्या सूचीपेक्षा जास्त होईल असे वाटते. कारण एक संबंध सूक्त संपल्याशिवाय पुस्तकाचें पान मुळींच उलटण्यास नको. सूचीमध्ये एकूनएक शब्द दिला आहे. एवढेच केवळ नव्हे, तर प्रत्येक शब्दाचें प्रत्येक रूपही दिलेले आहे. त्यामुळे सहज एकादे वेळीं नुसती सूची वाचली तरी त्यावरून शब्दांची वेदामध्ये होणारी निरनिराळी रूपें लक्षांत येऊन बराच फायदा होईल. निरनिराळ्या सूक्तांचे शब्द निरनिराळे देण्याची पद्धत स्वीकारल्यामुळे कांहीं कांहीं शब्दांची पुनरुक्ति करावी लागली. परंतु त्यास इलाज नव्हता.
 येथपर्यंत ह्या पुस्तकासंबंधानें ज्या ज्या विशेष गोष्टी सांगावयाच्या होत्या त्या सांगितल्या. आतां ज्यांचें ह्या कामास मला साहाय्य झाले त्यांचे आभार मानावयाचें श्रेष्ठ कर्तव्य तेवढे राहिले आहे. प्रथम, ग्रंथकारांपैकी ह्मटलें ह्मणजे मुख्यत्वें "विविधज्ञानविस्तार" कर्ते ह्यांचे माझ्यावर फार उपकार झाले आहेत. त्यांच्या एका लेखांतील कांही भाग तर एका स्वतंत्र परिशिष्टाच्या रूपानेंच जोडला आहे व. दुसऱ्या एका लेखाचा सारांश प्रस्तावनेंत दिला आहे. "विस्तारा" नंतर "वेदार्थयत्न" कार प्रसिद्ध विद्वान् रा. रा. शंकर पांडुरंग