पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२७ गल्या स्तुतींच्या योगानें (सुवृक्तिभिः ), बोलावितों ( हवामहे ). तुह्मी आ- ह्यांला ( अस्मे=अस्मभ्यं ) सुख ( शर्म ) द्या ( यच्छतम् ). ऋचा १० वी :- अस्मे=अस्मभ्यं. द्युम्नं द्योतमानं धनं. महि=महत्. " शर्म=गृहं. सप्रथः = सर्वतो विस्तीर्ण. ज्योति:= तेजः, अदितेः=देवमातुः अदितेः. " अवध्रं=अहिंसकं. ह्यापुढें “ अस्ति ” अध्याहृत आहे. ऋतवृधः=यज्ञस्य वर्धयित्र्याः, अदीनायाः. श्लोकं = स्तोत्रं, यद्वा यशः. सवितुः = प्रेरकस्य. मनामहे = कुर्महे, जानीमः यद्वा याचामहे.. मराठी अर्थ -- इन्द्र, वरुण, मित्र [आणि] अर्यमा [हे] आह्माला (अस्मे ) द्योतमान अरों धन (युम्नं ) [ आणि ] मोठे, विस्तीर्ण (महि, सप्रथः) गृह ( शर्म ) देवोत ( यच्छन्तु ). यज्ञाचें वर्धन करणाऱ्या ( ऋतवृधः ) [ देवमाता ] अदितीचें तेज ( ज्योतिः ) [ आह्मांला ] अहिंसक (अवध्रं ) [असो]. दानादिगुणयुक्त असा ( देवस्य ) जो सर्व प्रेरक सविता त्याचें आह्मी स्तोत्र (श्लोक) करितो ( मनामहे ) अथवा दानादिगुणयुक्त असा ( देवस्य जो सर्व प्रेरक सविता त्यांचे ह्म० त्यापासून जें आह्मांस [ यश ] मिळेल तें यश आयाचित (श्लोकं मनामहे ).